Monday, 16 May 2016

स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्याचा प्रयत्न करु - दिनेश वाघमारे

पिंपरी-चिंचवडचा इतर शहरांच्या तुलनेत विकासदर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे स्मार्टसिटी यादीतून जर एखादे शहरबाहेर पडले तर पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करु अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. 
पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. 14) चिंचवडमधील सायन्स पार्क येथे स्वयंसेवी संस्थांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन आयुक्त दिनेश वाघमारे यांचेहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, राजीव भावसार, कर्नल शशिकांत दळवी, विराज गुपचुप आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment