Wednesday, 25 May 2016

[Video] एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत


एमपीसी न्यूज - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोवती असलेले वादाचे शुक्लकाष्ठ कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. दाऊद प्रकरणी क्लिनचीट मिळताच ते परत एकदा नव्या वादात अडकले आहेत. पुण्याजवळील भोसरी एमआयडीसीच्या ताब्यातील एक प्लॉट त्यांच्या घरातल्यांनी बेकायदेशीररित्या 3 कोटी 75 लाखांना खरेदी केल्याचे प्रकरण पुढे आल्याने त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (वय 56) जावई गिरीश दयाराम चौधरी (वय 43) यांच्या नावाने याचा व्यवहार झाला असून, बाजारभावानुसार या जमिनीचे मूल्य 40 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याप्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत गवंडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील भोसरी येथे सर्व्हे नं. 52 हिस्सा नं. 2 अ/2 या मिळकतीवरील एकूण क्षेत्र एक हेक्टर 21 आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी व हसनैन झोएब उकानी (रा. कोलकत्ता, पश्चिम बंगाल) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सपैद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मुस्लिम पकरूद्दीन उकानी, नफीसा लियाकत काथवाला, मारिया मुस्तफा लकडावाला, सकीना नजीमुद्दीन उकानी, इन्सीया मुर्तुझा बादलावाला हे इतर वाटेकरी आहेत. उकानी यांची जमीन महामंडळाने (एमआयडीसी) 25 वर्षांपूर्वी संपादित केलेली आहे. ही जमीन परत मिळावी, याकरिता उकानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात 8 सप्टेंबर 2015 रोजी याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने उकानी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

No comments:

Post a Comment