Friday, 9 September 2016

खोटे आरोप, संशय, दिशाभूल करणारी माहिती! चांगल्या अधिकाऱ्यांना टिकवायचे का त्यांचे खच्चीकरण करायचे?

खोटे आरोप, संशय, दिशाभूल करणारी माहिती! चांगल्या अधिकाऱ्यांना टिकवायचे का त्यांचे खच्चीकरण करायचे? डॉ. श्रीकर परदेशी यांना आपण गमावले आता बस्स...
...झाले असे कि काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या सरचिटणीस पदावरील सदस्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा अभियंता श्री. प्रवीण लडकत यांच्यावर अतिशय चुकीचे आरोप केले, त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय घेतला, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवला. डॉ. श्रीकर परदेशी यांच्यावरही सुरवातीस असेच खोटे, चुकीचे आरोप करून त्याची परिणीती त्यांची बदली होण्यात झाली याला पिंपरी-चिंचवडकर जनता विसरली नसताना चांगल्या अधिकाऱ्यांना 'टार्गेट' करण्याची पुनरावृत्ती होत असेल तर शहरातील सजग व सुजाण जनता कदापिही सहन करणार नाही. इथे दिलेल्या खुल्या पत्रातून आम्ही केलेल्या चुकीच्या आरोपांचा निषेध करतो तसेच प्रवीण लडकत व पाणीपुरवठा खात्याचे चांगले कार्य तमाम जनतेपर्यंत पोहचवत आहोत. केलेले चुकीचे आरोप इथे वाचा http://goo.gl/akvf6y त्याचे प्रत्त्युत्तर म्हणून लिहिलेले 'खुले पत्र' इथे वाचाhttp://goo.gl/ZRwa36
सदर खुल्या पत्रात​ आरोप चुकीचे कसे, लडकत यांचा नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगल्या कामांचा लेखाजोगा, वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याविषयी छापून आलेल्या बातम्या व सरतेशेवटी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध सामाजिक संस्था, नागरिक यांनी त्यांचा अनुभव/प्रतिक्रिया मांडल्या आहेत... जरूर वाचा 'Open letter to Support Mr. Praveen Ladkat' - http://goo.gl/ZRwa36
हा मेसेज जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे भविष्यात अशी चूक कोणाकडूनही घडणार नाही!

No comments:

Post a Comment