Monday, 17 October 2016

स्मार्ट सिटीनंतर आता मेट्रो प्रकल्पात देखील पिंपरी-चिंचवडला ठेंगा?

​मुख्यमंत्री महोदय, श्री देवेंद्र फडणवीस दिनांक 7 मार्च 2015 रोजी आपण स्वतः मेट्रो फेज 1 निगडीपासून सुरु करावा अशी मंजुरी दिली असताना, केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (PIB) आपल्या निर्णयाच्या विरोधात निगडी ऐवजी पिंपरी ते स्वारगेट अशी मंजुरी देऊच कसे शकतात? का स्मार्ट सिटी, रेल्वे टर्मिनल नंतर आता मेट्रोसाठीसुद्धा पिंपरी-चिंचवडला डावलले जात आहे असे आम्ही नागरिकांनी समजायचे? पुणे मेट्रोचा प्रस्ताव थोड्याच दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी जाईल त्याच्या आत पिंपरी ऐवजी निगडी पासून मेट्रो सुरु होईल याची दुरुस्ती आपण कराल अशी पिंपरी-चिंचवडकरांना आशा वाटते...

No comments:

Post a Comment