Tuesday 22 August 2017

जुनी सांगवीत गणपती उत्सवासाठी घाट सज्ज

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मुळा व पवना नदीच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीत गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. गणरायाच्या आगमनाच्या तयारीत  गणेश मंडळाची लगबग सध्या परिसरात सुरू असुन पालिका प्रशासनकडुनही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले जुनी सांगवीत सात ते दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवासाठी संपुर्ण व्यवस्था ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील मुळा पवना नदी परिसरातील घाटांच्या दुरूस्ती बरोबरच घाटांची स्वच्छता, विसर्जन हौदांची स्वच्छता आरोग्य व स्थापत्य विभागाकडुन करण्यात आली आहे. याच बरोबर मिरवणुक रस्त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment