Thursday, 24 August 2017

विनापरवाना मंडप उभारणाऱ्यांवर कारवाई

महापालिकेचा इशारा : गणेश मंडळांना परवानगी बंधनकारक
पिंपरी – शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून दुसरीकडे महापालिका प्रशासनाने शहरातील गणेश मंडळांना कायद्याचा हंटर उगारला आहे. विनापरवाना मंडप उभारल्यास ते बेकायदेशीर ठरवून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच अशा मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment