Thursday 21 September 2017

विद्यार्थ्यांनी घेतली महापौरांची शाळा

पिंपरी – निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि. 20) महापालिकेचा अभ्यास सहल दौरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापौर नितीन काळजे, आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी शहरातील अनेक समस्यांची गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नामुळे महापौर काळजे हे चांगलेच कोंडीत पकडले गेले होते. मात्र, त्यांनी स्वतःला सावरुन घेत विद्यार्थ्यांना उत्तरे दिली. परंतु, महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. तर विरोधी नगरसेवकांची महापौरांना कोंडीत पकडण्याची नामी संधी गेल्याने, तिच संधी मॉडर्न हायस्कूल विद्यार्थ्यांनी भरुन काढत महापौरांची त्यांनी शाळा घेतली.

No comments:

Post a Comment