Wednesday, 27 September 2017

ई-टॉयलेटचे निगडीत उद्‌घाटन

निगडी - स्मार्ट आणि स्वच्छ शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पहिल्या ई टॉयलेटचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २५) निगडीत झाले. शहरात अजून चार ठिकाणी अशी ई टॉयलेट उभारण्यात येणार आहेत.
महापालिका आणि सॅमटेक कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ई टॉयलेटची गरज, किफायतशीरपणा यावर उपस्थित मान्यवरांनी मते मांडली. स्वच्छता अभियानात ई टॉयलेटची गरज असून, या अभियानाला यामुळे अधिक चालना मिळेल. अशा टॉयलेटच्या उभारणीसाठी अधिक पुढाकार घ्यावा; तसेच स्वच्छ शहरासाठी पालिकेने अशा टॉयलेटची संख्या वाढवावी. प्रसंगी अधिक आर्थिक भार पेलावा, अशीही सूचना वक्‍त्यांनी या वेळी केली.

No comments:

Post a Comment