Wednesday, 15 November 2017

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी अंकिता बोडकेची निवड

पुणे – निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाची खेळाडू अंकिता बोडके हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून ती मध्यप्रदेश येथील देवास या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नुकतीच रवाना झाली आहे. जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या मुलींच्या राज्यस्तरीय 17 वर्षांखालील शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये अंकिता बोडके हिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर तिची मध्यप्रदेशमधील देवासमध्ये होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. अंकिता ही ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असून तिला भगवान सोनवणे व स्वाती ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी विद्यालयाचे केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, क्रीडाकुलप्रमुख भगवान सोनवणे, प्रार्चाया प्रज्ञा पाटील, केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर यांनी अंकिताला शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment