Wednesday 15 November 2017

मालामाल ‘डेली’

महापालिका ही आर्थिक संपन्नता असणारी महापालिका आहे. या महापालिकेला रोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. ते महापालिका विविध बॅंकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. तो लगेच खर्च होत नसल्याने विविध बॅंकांमध्ये दिर्घमुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातो. उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने रोज मिळणारे उत्पन्नही अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात विविध बॅंकांमध्ये ठेवण्याचा निर्णयाला भाजपने पाठबळ दिले. 

No comments:

Post a Comment