Friday, 4 May 2018

‘क’ क्षेत्रीय कार्यालयावर बहूजन रिपब्लिक सोसालिस्ट पार्टीचे आंदोलन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील बालाजीनगर, खंडेवस्ती परिसरात ऐन उन्हाळात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणी टंचाई होवू लागली आहे. याकडे प्रभाग क्रमांक आठ मधील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करु लागले आहेत. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालयावर आज (गुरुवारी) महिला व नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासह विविध मागण्यांसाठी हंडा मोर्चा काढण्यात आला. तसेच येत्या आठ दिवसात सदरील मागण्यांवर कार्यवाही न केल्यास क क्षेत्रीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.

No comments:

Post a Comment