Saturday 5 May 2018

पुणे: मेट्रो मार्गाचे सेगमेंटही सुपरफास्ट

वाकड येथील 7 एकर जागेत सुरू आहे उभारणी
पुणे – पुणे मेट्रो मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. सुमारे 31 किलोमीटर लांबीच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गावरील सुमारे 25 किलोमीटरचा मार्ग खांबावरून असणार आहे. तर 5 किलोमीटरचा मार्ग हा भूयारी आहे. त्यामुळे जो मार्ग खांबावरून जाणार आहे. त्या खाबांना जोडणाऱ्या सेगमेंटचे काम वेगात सुरू आहे. यातील वनाज ते रामवाडी (रिच 2) या मार्गातील वनाज ते धान्य गोदाम या टप्प्यात सुमारे 300 खांब असणार आहेत. या खांबाच्या जोडणीसाठी तब्बल 2500 सेगमेंट उभारली जाणार आहेत. त्या अंतर्गत महामेट्रोकडून प्रती महिना 120 ते 150 सेगमेंट महिन्याला तयार केली जात आहे. वाकड यथील 7 एकर जागेतील कास्टिंग यार्डमध्ये ही सेगमेंटची निर्मिती सुरू असल्याची माहिती रिच 2 चे प्रकल्पाधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

No comments:

Post a Comment