Sunday 6 May 2018

…तोपर्यंत पालिकेने ओला कचरा स्वीकारावा!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा असणाऱ्या हौसिंग सोसायट्यांचा कचरा 1 एप्रिल 2018 पासून स्वीकारणे बंद केले आहे. ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था सोसायटीला करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक सोसाट्यांनी कचरा जिरविण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे सोसायट्या अशी व्यवस्था करत नाहीत, तोपर्यंत ओला कचरा स्वीकारण्यात यावा, अशा सूचना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत.

No comments:

Post a Comment