Saturday 1 September 2018

भाजपा पिंपरी चिंचवड माजी शहराध्यक्ष श्री सदाशीव खाडे यांची प्राधिकरण अध्यक्ष पदी निवड

भाजपा पिंपरी चिंचवड माजी शहराध्यक्ष श्री सदाशीव खाडे यांची प्राधिकरण अध्यक्ष पदी निवड. राज्यशासनाच्या आजच्या निर्णया पैकी महत्वाचा निर्णय.

‘दहीहंडी’चे राजकीय ‘लोणी’

पिंपरी, 3‍1 ऑगस्ट 2018 – दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. प्रत्येक थरातील गोविंदाने कसून मेहनत घेतली आहे. यात केंद्रबिंदू असतो बालगोविंदा. प्रत्येक थरातील गोविंदाच्या खांद्यावर पाय ठेवून बालगोविंदा हंडीपर्यंत पोहचत असतो. तो हंडी फोडतो. त्याच्या आनंदाला पारावार राहात नाही. ‘माखन चोरी’त यशस्वी झाल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावतो. मात्र प्रत्यक्षात त्याला ‘लोणी’ चाखायला मिळत नाही. मग हे लोणी कोणाच्या घशात गेलेले असते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोट्यवधीच्या महापालिकेतील अतिक्रमण विरोधी पोलीस पथक कार्यालयात सुविधाचा अभाव

एकेकाळी आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विकास कामावर कोट्यावधीच्या निधी खर्च केला जातो.  महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयेही त्याच पध्द्तीने व्यवस्थित आहेत. मात्र अतिक्रमण विभागाकडे पालिकेने कानाडोळा केल्याचे दिसत आहे. अतिक्रमण विरोधी पोलीस पथकाच्या कार्यालयात सुविधांचा अभाव असल्याने त्या ठिकाणी बसायला खुर्च्याही नाहीत. तर बाहेर जाण्यासाठी असलेली वाहने डिझेल नसल्याने बंद पडून आहेत.

नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्टिट्यूट्‌सच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक संस्था, गुरुजनांचा गौरव

पिंपरी (Pclive7.com):- मॅनेजमेंट, मार्केटिंगच्या काळात शिक्षणाचा व्यापक विचार वाढत जाणे गरजेचे आहे. मनुष्याला कौशल्युक्त शिक्षण आवश्यक असून जडणघडणीतील महत्वपूर्ण टप्पा आहे. परंतु, ते पुरेसे नाही. मनुष्य घडविणारे शिक्षण मनुष्याला सर्वाधिक उपयुक्त बनविते. त्यासाठी आजमितिला मनुष्य घडविणारे शिक्षण देण्याची ख-या अर्थाने आवश्यकता आहे, असे मत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे केंद्र प्रमुख वा.ना. अभ्यंकर यांनी व्यक्त केले. 

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक; इंटरनेट सुविधा मोफत मिळत असताना कोट्यवधींची उधळपट्टी का?

स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत फायबर ऑप्टिकल नेटवर्कीगच्या कामासाठी तब्बल 255 कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर, दुसरीकडे अनेक खासगी मोबाईल कंपन्या मोफत इंटरनेट व इतर आवश्यक सुविधा मोफत व अल्पदरात देत आहेत. असे असताना हा खर्च करून पालिका नागरिकांच्या कररूपी पैश्यांची उधळपट्टी का करीत आहे, असा सवाल स्मार्ट सिटीचा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. समितीची बैठक महापालिकेच्या आयुक्त कक्षात शुक्रवारी (दि.31) झाली.

.पिंपरी पालिकेत आयुक्तांचा मनमानी कारभार -दता साने

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतून ५६ कंपन्यांचा काढता पाय..

हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि पन्नास लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केले आहे. कंपन्यांचे स्थलांतर असेच सुरू राहिले, तर आयटी पार्कची अवस्था रोजगाराच्या दृष्टीने बिकट होण्याची दाट शक्यता आहे.

९० हजार तरुणांना पैसे परत मिळणार?

पुणे : वाहक, चालक, क्लिनर आणि वर्कशॉपमधील अन्य पदांसाठी भरतीचा निर्णय ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने दोन वेळा घेतला होता. पहिल्यांदा 2012मध्ये आणि त्यानंतर 2016मध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने साडेआठ हजार पदांसाठी अर्ज मागविले होते. भरतीच्या नावाखाली तब्बल 90 हजार बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाच्या हे प्रकरण अंगलट आले आहे. हा महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर हात झटकणार्‍या प्रशासनाने उशिरा का होईना पण याची जबाबदारी घेतली आहे. या तरुणांनी न्यायालयाचे दार ठोठाविण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना ही रक्कम परत करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने घेतला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

जॉईंट तुटल्याने ‘बीआरटी’त बस बंद

पिंपरी-चिंचवड : बसच्या इंजिनमधील जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बीआरटी मार्गात बंद पडली. ही घटना गुरुवारी दुपारी पाचच्या सुमारास एच ए कॉलनी स्टॉपवर घडली. बीआरटी बस बंद पडल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.  हडपसरवरून निगडी भक्ती-शक्तीकडे जाणारी बीआरटी बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 1869) पिंपरीमधील एच ए कॉलनी बस स्टॉपवर आली असता, इंजिनमधील तांत्रिक दोषामुळे (जॉईंट तुटला) बंद पडली. दरम्यान बसमधून सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. चालक व वाहक दोघांनी मिळून प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून प्रवाशांच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था केली.

निविदा मॅनेज करण्यासाठी ‘सीएम’ कार्यालयातून दबाव

पिंपरी-चिंचवड : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात येणार्‍या निविदा मॅनेज करुन ठराविक ठेकेदाराला देण्यात याव्यात यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी दबाव टाकत आहेत. भाजपचे प्रवक्ते असलेले आयुक्तही त्या दबावाला बळी पडून काम करत आहेत. नामांकित कंपन्या निविदा भरण्यासाठी इच्छूक असताना केवळ तीनच कंपन्यांच्या निविदा आल्या आहेत. या निविदा भरण्याचे नियोजन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावरुन झाले असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसने केला. तसेच आयुक्तच भ्रष्टाचाराचे नियोजन करत आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘स्मार्ट सिटी’चे विषयपत्र इंग्रजीमध्ये!

पिंपरी-चिंचवड : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज राजभाषा असलेल्या मराठीतूनच करावे, असा आदेश असतानाही त्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर पडला आहे. पालिकेच्या स्मार्ट सिटीची  विषयपत्रिका इंग्रजी भाषेत काढली आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

मेट्रो, कॅब आणि पीएमपीसाठी एकच तिकीट

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो मार्गावर ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टिम’ ही यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मेट्रो, कॅब आणि पीएमपी बसमधून एकाच तिकिटावर प्रवास करणे शक्य होणार आहे.

लँड माफिया घुसले ‘ग्रीन झोन’मध्ये !

पिंपरी-चिंचवड : शहराच्या ठिकाणी स्वत:च एक घर असावं, हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. जागा घेऊन घर बांधणे हे तर त्यापेक्षा स्वप्न! याच मानसिकतेचा फायदा उठवत लॅण्ड माफियांनी चक्क पिंपरी-चिंचवडमधील ग्रीन झोनचा बाजार मांडला आहे. पॉश राहणी, चकचकीत कार्यालय आणि कमिशनवर नेमलेल्या बोलबच्चन एजंटांचा ताफा एवढ्याच भांडवालवार राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने दररोज लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभराची पुंजी सामान्य माणूस प्लॉटसाठी देतो. मात्र, प्लॉट नावावर होत नसल्याचे अगदी अखेरच्या क्षणी समजल्यानंतर तो संपूर्ण उध्वस्त होतो. याविरोधात काही आवाज उठवावा इतपर्यंतही त्याच्या अंगात त्राण उरत नाही. आणि एखाद्या अंगात असलाच जोर तर त्याला राजकीय दबावातून त्याची मुस्कटदाबी केली जाते…हा सारा प्रकार तळवडे, चिखली, पंतनगर या भागात सुरू आहे. आता या लॅण्डमाफियाची नजर चिखलीमधील शेतजमिनीवर गेली आहे. चिखली येथील गट नं. 754/755 मधील शेतजमीन ग्राहकांची दिशाभूल करून विकण्यास सुरूवात केली आहे.

रुग्णसेवेचा दर्जा सुधारावा वायसीएमच्या बैठकीत सूचना

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) रूग्णसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्याबाबत आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावावा, अशा सूचना गुरुवारी (ता. 30) रुग्णालयात आयोजित बैठकीत करण्यात आल्या. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेतर्फे काम

पिंपरी - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने विसर्जन घाटांची डागडुजी, तात्पुरते विसर्जन टॅंक बांधणे इतर कामे हाती घेतली आहेत. दरवर्षीप्रमाणे घाटांची डागडुजी. निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्याची कामे प्रभागस्तरावर सुरू आहेत. येथील झुलेलाल घाटाची साफसफाई केली आहे. तेथे अगोदरच मूर्तिदानासाठी हौद बांधला आहे. असाच हौद थेरगावातील घाटावर बांधला आहे. त्याला टाईल्सही बसविल्या आहेत. मुख्य घाटाच्या पायऱ्यांनजिक सिमेंटचे कट्टे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी एकाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच पूर्ण होईल. या व्यतिरिक्त घाटाच्या वरील बाजूच्या भिंतीचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भोसरीतील धावडेवस्तीतील एका विहिरीवरही मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे. 

पालिकेने पात्र लाभार्थ्यांच्या उशीरा आलेल्या जीएसटी पावत्या स्वीकारण्याची मागणी

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून सर्वसामान्यांसाठीच्या विविध योजना राबविण्यात येतात. सध्या नागरवस्ती विभागाकडून सायकल, शिलाई मशीन आदी योजनांसाठी पात्र लाभार्थी व कागदपत्रांच्या त्रुटीत अपात्र लाभार्थी यांची वस्तु खरेदीच्या जीएसटी पावत्या नागरवस्ती विभागाकडे जमा करण्यासाठी गर्दी आहे.

नाशिक रस्ता होणार मोकळा?

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त देण्यात येईल. ग्रामीण भागातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आदींसह इतर प्रमुख पोलिस ठाण्यात किमान ५० पोलिस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुण्यात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.

वेतनावरील खर्च ५१ टक्‍क्‍यांवर

पुणे - ‘‘पीएमपीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांची वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा पाच कोटी रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, पीएमपीचा वेतनावरील खर्च ५१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे,’’ अशी माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

‘रुपी’ पुनरुज्जीवनाच्या हालचाली

पुणे – रुपीच्या विलिनीकरणासाठी अद्याप कोणत्याही सक्षम बॅंकेचा प्रस्ताव आलेला नाही. त्याचबरोबर नजिकच्या काळात सुद्धा एखादा प्रस्ताव येईल, असे वाटत नाही. त्यामुळे रुपी बॅंकेचे पुनरुज्जीवन हा एकमेव पर्याय असल्याने त्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी प्रशासकीय मंडळाच्यावतीने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे(आरबीआय) करण्यात आली आहे. दरम्यान, रुपीच्या निर्बंधांना आज आरबीआयने तीन महिन्यांची मुदतवाढ सुद्धा दिली आहे.

टोमॅटोचा “चिखल’

पिंपरी – टोमॅटो दहाला दोन किलो…घ्या हो भाऊ…घ्या हो ताई…अशी आरोळी ठोकून विक्रेत्यांच्या घशाला कोरड पडली आहे. पाच रुपये किलो दराने विक्री होवूनही टोमॅटोची विक्रमी आवक वाढल्याने टोमॅटो कचरा कुंडीत फेकून देण्याची वेळ पिंपरीतील फळभाजी विक्रेत्यांवर आली आहे.

‘हॉकर्स झोन’चा प्रश्‍न मार्गी लावा!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील अतिक्रमणांवरून शहरातील फेरीवाले धास्तावले आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईसाठी आरोप, प्रत्यारोप करणाऱ्या खासदार, आमदारांनी “हॉकर्स झोन’साठी एकत्र यावे, अशी मागणी फेरीवाला महासंघाकडून करण्यात आली आहे.

“वायसीएम’ प्रशासनाचा निषेध

पिंपरी – महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना योग्य रुग्णालयीन सुविधा मिळत नाहीत. महापालिका आणि रुग्णालय प्रशासन रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी कमी पडत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड शहर भारिप बहुजन महासंघच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

अतिक्रमणमुक्‍त महामार्गांसाठी जादा कुमक

पुणे – “ग्रामीण भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. महामार्गांवरील चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगावसह सर्वच प्रमुख ठाण्यांत किमान 50 पोलीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग अतिक्रमणमुक्‍त करण्यावर भर देणार,’ अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पोलीस स्टेशनमध्ये धिंगाना घालणाऱ्या तरूणींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

चौफेर न्यूज  दारू पिऊन मध्यरात्री भर रस्त्यावर पोलीसांशी हुज्जत घालून पोलीस स्टेशनमध्ये धिंगाना घालणा-या तरूणींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोरवाडी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून हा प्रकार गुरुवारी (दि. ३०) मध्यरात्री एक वाजता वाल्हेकरवाडी मधील आहेर गार्डनच्या बाहेर घडला. त्यावरून एक तरुण आणि दोन तरुणी असे तिघांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

‘सागरमाथा’ने केली माउंट मेन्टोक ‘कांगरी’वर यशस्वी चढाई

भोसरी : भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने लेह-लडाख परिसरातील माउंट मेन्टोक कांगरी हे 6250 मीटर उंचीचे शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पवार, संदीप तापकीर, सुमित दाभाडे, संग्राम बुर्डे, श्रीकांत जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीधर घाडगे, निकेश रासकर व संकेत घुले या दहा सदस्यांनी ही मोहीम यशस्वी केली. संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त ही मोहीम आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीण हरपळे यांनी दिली. पुणे येथून 12 ऑगस्ट रोजी मोहिमेस सुरवात झाली. पुणे-दिल्ली-मनालीमार्गे सर्व सदस्य 15 ऑगस्ट रोजी लेह येथे पोहोचले. स्वातंत्र्यदिनी मनाली-लेह या मार्गातील अतिउंचवरील रोहतांग पास (13060 फुट), बारलाचा पास (16500 फुट), नकिला पास (15547), लाचुंगला पास (16616 फुट) आणि तांगलांगला पास (17480 फुट) या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून करून 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.