Tuesday 30 October 2018

राहण्यासाठी ​लोकांची पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराला अधिक पसंती - रवींद्र भुसारी

भारतीय जनता पक्षाचे माजी संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी सोमवारी थेरगाव येथील भगवती पालम्स सोसायटीला भेट दिली. याप्रसंगी नगरसेविका व स्थायी समिती अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, तसेच प्रदेशाध्यक्ष आशिष मेरखेड उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराची जडणघडण, शहराच्या जडणघडणीत संघाचे असणारे योगदान, सोशल मीडियाचे महत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आयटीयन्सला उद्देशून केलेले भाषण अश्या विविध विषयांवर माजी संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी यावेळी अभ्यासपूर्ण चर्चा केली. 

पिंपरी महापालिकेत रेकॉर्डवरचे २६ नगरसेवक

पिंपरी : शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करून पोलिस प्रशासनावर कोरडे ओढणाऱ्या नगरसेवकांपैकी २६ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फसवणूक, खून, हाणामारी, दरोड्याची तयारी असे गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकांमध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अधिक आहेत. मागील दीड वर्षांत सात नगरसेवक आणि चार नगसेविकांच्या पतींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

दिवाळीत फटाके फोडताना वायू प्रदुषण टाळा

पिंपरी चिंचवड : दरवर्षी दिवाळी उत्सवादरम्यान फटाक्यामुळे काही अनुचित घटना घडत असतात. यावर्षी तशाप्रकारच्या घटना घडू नये, याकरीता तसेच होणारे ध्वनी, वायू प्रदूषण टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून नागरिकांना सूचना करत त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नेहरुनगर पीएमपी आगारात बस धुण्यासाठी यंत्र

पिंपरी चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या नेहरुनगर आगारात यंत्र क्रांती’ झाल्याने कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बसेस धुण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने गेली अनेक वर्षे राबविणार्‍या हातांना आराम मिळाला आहे.

PMPML considers free bus rides for a day every month

PIMPRI CHINCHWAD: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) wants to start free bus rides for a day every month to encourage more commuters to use the public transport.

'तिसऱ्या मुंबई'चा तळेगाव हा केंद्रबिंदू : गिरीष बापट

पुणे : भविष्यात तिसरी मुंबई होणार असेल; तर तळेगाव हा विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे सांगितले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते आदी उपस्थित होते. 

सतरा हजार बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस

पिंपरी - महापालिकेतर्फे शहरातील महापालिका रुग्णालये व दवाखान्यांमध्ये देण्यात येणाऱ्या पोलिओ प्रतिबंधक लस या वर्षभरात १७ हजार १५ बालकांना देण्यात आली. सप्टेंबरअखेरपर्यंतची ही स्थिती आहे.
पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. बालकांना दिव्यांग करणारा हा संसर्गजन्य रोग आहे. देशात १९९५ पासून पोलिओ प्रतिबंधक मोहिमेला सुरवात झाली. जागतिक आरोग्य संघटनेने २०१४ मध्ये भारताला १०० टक्के पोलिओमुक्त जाहीर केले. महापालिका रुग्णालयांमध्ये बालकांना जन्मत:च पोलिओचा डोस दिला जातो. त्यानंतर दीड, अडीच आणि साडेतीन महिन्यांचे बाळ झाल्यानंतर ओरल पोलिओ डोस दिला जातो. त्याशिवाय दीड आणि साडेतीन महिन्यांच्या बाळाला इंजेक्‍शनद्वारे पोलिओ डोस दिला जातो. ९ महिने आणि १.५ वर्षाचे बाळ झाल्यानंतर ओरल पोलिओ डोस दिला जातो.

स्वच्छतेचा ध्यास घेतलेला अवलिया

वाल्हेकरवाडी - प्लॅस्टिकमुक्ती, प्लॅस्टिकमुळे होणारे परिणाम इ. गोष्टींवर फक्त चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटामाटात स्वच्छता अभियान सुरू केल. अनेक नेत्यांनी हातात झाडू घेऊन फोटोसेशनही केलं; पण फोटोसेशन संपलं आणि सावर्जनिक ठिकाणी पुन्हा कचरा दिसू लागला. रावेत भागात असाच कचरा साफ करण्याचं काम एक अवलिया गेल्या तीन वर्षांपासून करतोय.

खासगी ट्रॅव्हलची मनमानी

पिंपरी - तुम्ही जर खासगी ट्रॅव्हलच्या बसने बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत असाल, तर जादाचे पैसे मोजण्याची तयारी ठेवा. ऐन सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हलने बसच्या भाड्यात तिपटीने वाढ केली आहे. परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. 

सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी बैठकांचे सत्र

पिंपरी – गेली दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्‍नांवर महापालिकेत आता लोकप्रतिनिधींच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तरी पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत, याकरिता भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. 29) निगडी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात बैठक घेतली. काही दिवसांपुर्वी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यालयात याच विषयावर बैठक घेतली होती.

महावितरणकडून “आरटीआय’चा भंग

पिंपरी – महावितरण कंपनीकडे माहिती अधिकारात मागविलेली माहिती देण्यासंदर्भात गोपनीयता न पाळता अर्जदाराची माहिती ठेकेदाराला पुरविल्याचा आरोप विद्युत वितरण समिती सदस्य राहुल कोल्हटकर यांनी केला आहे. माहिती न देण्यासाठी या ठेकेदाराने धमकविल्याची तक्रार कोल्हटकर यांनी पोलिसांत दिली आहे. याशिवाय या प्रकाराला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजकीय फटाके फुटणार!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचा कर्जत येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी भाजपने निगडी-प्राधिकरणात कार्यकर्ता मेळावा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने रहाटणी येथे कामगारांची परिषद घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची रणनिती आखली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची एकाच दिवशी शहरात सभा होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात

पिंपरी – निगडी-प्राधिकरणात येत्या 3 नोव्हेंबर रोजी होत असलेला भाजपचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सभेच्या व्यासपीठासाठी करण्यात आलेल्या बेकायदा वृक्षतोडीवरुन नाराजी व्यक्त होत असतानाच आता मेळाव्याच्या तयारीसाठी ऐन दिवाळीच्या सुट्टीत मदनलाल धिंग्रा मैदान सात दिवस बंद ठेवले जाणार आहे. त्याला प्राधिकरणातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र विरोध केला आहे.

उद्योजकांना भेडसाविणाऱ्या समस्यांचा उहापोह

पिंपरी – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथे 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांना भेडसाविणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह करण्यात आला. पाठपुरावा करुनही वीज दरवाढ, शास्ती कर, माथाडी कायदा हे प्रश्‍न अद्याप प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

पूर्व “पीसीएमटी’ कर्मचाऱ्यांना न्याय कधी?

पिंपरी – पूर्व पीसीएमटी आणि पीएमटीचे विलीनीकरण होऊन पीएमपीएमएल प्रशासन अस्तित्वात आल्यानंतर पीसीएमटी कर्मचाऱ्यांच्या पूर्वी दिलेल्या सवलती, वेतनश्रेण्या रद्द करण्यात आल्या. पूर्व पीसीएमटीतील कर्मचाऱ्यांवर झालेला हा अन्याय दूर करावा आणि सेवानिवृत्त व सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना काढून घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांचा कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.29) काढले आहे.

अतिरिक्‍त आयुक्‍तपदी संतोष पाटील

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा संतोष पाटील यांनी आज सोमवारी (दि.29) पदभार स्वीकारला आहे. महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, पाटील यांची महिनाभरापूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी पालिकेत बदली झाली होती. महिन्याभरानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

पीएमपीमुळे वाहतुकीचे चार तास “ब्रेक डाऊन’

पिंपरी – रविवारच्या सुट्टीमुळे दिवाळीच्या खरेदीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या आनंदावर पीएमपीने अक्षरशः विरजण घातले. पिंपरी मुख्य बाजारपेठेतील सर्वाधिक वर्दळीच्या शगुन चौकात पीएमपीची एक बस बंद पडली. तिच्यामुळे मागून येणाऱ्या दहा बस अडकल्या. पुढे-मागे होता येत नसल्याने या बसेसह खासगी वाहनेही या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प झाली होती.

मोशीतील पादचारी पूल बनला मद्यपींचा अड्डा

मोशी- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी येथील पादचारी पूल टवाळखोर, मद्यपींसाठी दारू पिण्याची हक्काची जागा झाली आहे. या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत, त्यामुळे भर चौकालगत “ओल्या पार्ट्या’ रंगत आहेत.

आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत “रेटींग” नुसार कर सवलत

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत आता रेटींग नुसार सामान्य करात सवलत दिली आहे. मात्र, शहरी व ग्रामीण भागातील सोसायटींमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. या रेटींग मिळवणाऱ्या शहरी भागातील सोसायटींना सामान्य करात किमान 25 टक्‍के सवलत मिळणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील सोसायटीने त्याच दर्जाचे काम केल्यास त्यांना केवळ 10 टक्‍केच सवलत मिळणार आहे.

सायन्स पार्कमध्ये फटाके व दुष्परिणामवर व्याख्यान

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परीषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील सभागृहात शनिवारी (दि.3) सायंकाळी साडेपाच वाजता विज्ञान व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मराठी विज्ञान परिषद पुणेचे कार्याध्यक्ष विनय र. र. हे फटाके व आरोग्यावरील दुष्परिणाम विषयावर व्याख्यान देणार आहेत, अशी माहिती सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी मदनमोहन साळवे यांनी दिली.