Pages

Saturday, 28 March 2020

'कोरोनामुक्त' रुग्णांना घरी सोडतानाचा आनंद [Video]

कोरोनामुक्त' झालेल्या तीन रुगांना आज वायसीएम मधून घरी सोडण्यात आले. आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी यांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.

Citizens across Pune and Pimpri Chinchwad take the lead, help police with food and water

Citizens across Pune and Pimpri Chinchwad take the lead, help police with food and water  

शहरात ‘कोरोना’ला ब्रेक; सात दिवसांपासून एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील सात दिवसांपासून कोरोनाचा एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. त्याउलट तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे आनंद व्यक्त केला जात असून, दक्षता घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो, असा विश्वास शहरवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. तर, परदेशातून आलेले एक हजार 342 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरातील 4 लाख 78 […]

स्वयंसेवी संस्थांना पासेस

संचारबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थी; तसेच रस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना मदतीसाठी अन्नपदार्थांची पाकिटे वाटण्यासाठी फक्त स्वयंसेवी संस्थांना परवानगी देण्यात येणार असून, राजकीय पक्षांना परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी संबंधित संस्थांना तहसीलदार कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पासेस घ्यावे लागणार आहेत.

Pimpri: ‘लॉकडाऊन’मध्ये औद्योगिक ग्राहकांना वीज बील भरण्यास मुदतवाढ द्या-लघुउद्योग संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन कालावधीसाठी औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलामधून मागणी शुल्क आणि मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल भरण्याची मुदत 30 जून  2020 करावी. त्यावरील व्याज व विलंब शुल्क माफ करावे,  अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितीन राऊत […]

कौतुकास्पद! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने वाढदिवस साजरा न करता १०० कुटुंबाला केलं धान्यवाटप

गरीब कुटुंबाला एक वेळचं जेवण मिळणार असून गणेश यांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे 

आयटी कंपन्यांना दिलासा; डेस्कटॉप कॉम्प्युटर्सच्या वाहतुकीला पोलिस,आरटीओ देणार NOC

पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्यांना त्यांच्या डेस्कटॉप कॉम्प्युटर्सची वाहतूक करायची असेल तर त्यासाठी 'ना हरकत पत्र' प्रमाणपत्र (एनओसी) वाहतूक पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून (आरटीओ) तात्काळ देण्यात येणार आहे. 

पुण्यात 'या' दोन प्रायव्हेट लॅबमध्ये होणार कोरोनाचे निदान

पुणे  : केवळ सरकारी यंत्रणेतीन कोरोना निदानावर अवलंबन न रहाता आता मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाही रोगनिदानाची परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले आहे. त्या अंतर्गत पुण्यातील गोळविलकर मेट्रोपोलिस लॅब आणि ए. जी. लॅबोरेटरीज येथे याचे निदान होणार आहे. 

...आता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात होणार कोरोना तपासणी

पिंपरी : कोरोना लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची तपासणी आता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम)होणार आहे. तशी मान्यता भारतीय वैद्यक संशोधन (आयसीएमआर) परिषदेने दिली आहे. दहा दिवसांत लॅब उभारून घशातील द्रव पदार्थ नमुने (स्वॅब) तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही तासात कोरोना संसर्गजन्य रुग्ण ओळखता येणे शक्य होणार आहे.

बातमी महत्त्वाची : स्वत: सिलेंडर आणताय, तर रिबेट नक्की मागा!

पुणे : नागरिकांनो, तुम्ही गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊन सिलेंडर घेणार असाल, तर तुम्हाला एजन्सी धारकाने 26 रुपये 50 पैसे एवढी सूट (रिबेट) दिली पाहिजे. त्यांच्याकडून सिलेंडर घेताना त्यांना या नियमाची आठवण करून द्या आणि हे रिबेट नक्की त्यांच्याकडे मागा.

Corona Effect : इंटरनेटची मागणी चौपटीने वाढली; पण कनेक्शन जोडणार कोण?

पिंपरी : कोरोना संसर्गामुळे कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडीओ कॉल, कॉन्फरन्स यामुळे डेटाची मागणी या आठवड्यात चौपटीने वाढली आहे. घरबसल्या माहिती देवाण-घेवाण होत असल्याने इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ७ आयएएस अधिकारी

पुणे - लॉकडाऊनच्या काळात पुणेकरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता सात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी (ता. २६) या अधिकाऱ्यांची समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर ) म्हणून नेमणूक केली आहे. या सर्वांवर प्रत्येकी एका विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Coronavirus : मोठी बातमी : पिंपरी चिंचवडमध्ये आता राहिले फक्त नऊच रुग्ण

पिंपरी - शहरातील कोरोना बाधित 12 रुग्णांपैकी पहिल्या तीन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याने हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले. आज शुक्रवारी (ता. 27) वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच, त्यांना पुढील 14 दिवस होमकोरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.  त्यांना टाळ्या वाजवून वाय सी एम मधून निरोप देण्यात आला.

Coronavirus : अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांसाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पासेस देण्यास सुरुवात

पिंपरी - अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असतानाही पोलीस तुम्हाला अडवत असतील, तर आता चिंता करू नका. अशा सेवेत काम करणाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संबंधितांना पासेस देण्यास सुरुवात झाली आहे.

दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई

जिल्हा शल्य चिकित्सक; सांगलीतील रुग्णांची प्रकृती स्थिर
सांगली – सांगली जिल्ह्यात नऊ करोना बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळली नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

क्वारंटाईन कक्षांची वेगाने उभारणी

शिक्षण आयुक्तांकडून पाहणी; आवश्‍यक सुविधांना प्राधान्य

पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात क्वारंटाईन कक्षांची उभारणी वेगाने करण्यात येऊ लागली आहे. या कक्षांमध्ये आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.