Pages

Sunday, 5 April 2020

कोरोना विरोधातील लढ्यासाठी महापालिकेत वॉर रुम; शहरातील 80 ठिकाणचे सीसीटीव्ही उपलब्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराविरुध्द यशस्वी लढा देण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे. महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची पाहणी केली. महानगरपालिकेच्या वतीने कोरोना (COVID-19) वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यामध्ये पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरातील विविध ठिकाणच्या 80 सीसीटीव्हीचे थेट फुटेज उपलब्ध आहे. याद्वारे संचारबंदीच्या […]

व्हॉटस्‌ऍपच्या ग्रुप ऍडमीनवरसह दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी – ठराविक धर्माच्या नागरिकांकडून कोणतेही साहित्य खेरदी करू नका, अशी व्हॉटस्‌ऍपवर पोस्ट टाकण्यात आली. याप्रकरणी ग्रुप ऍडमीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी परिसरात घडली.

पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी आढळले सहा पॉझिटिव्ह

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात आज एकाच दिवशी सहा करोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या सध्या नऊ झाली आहे. त्यातील चारजण सहा महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल आहेत. तर एकजण पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असून सध्या तो पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर एकजण पिंपरीतील डी वाय पाटील रुग्णालयात उपचार घेत असून तो खडकी परिसरातील राहणारा आहे.

[Video] इस्कॉन अन्नामृत व बजाज समूहाच्या वतीने गरजूंना भोजन, बजरंग दलाने घेतली वितरणची जबाबदारी

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अचानक उद्‌भवलेल्या या परिस्थितीमुळे शहरभागातील विद्यार्थी, गरीब, मजूर, झोपडपट्टीतील नागरिक, तृतीयपंथी व भिक्षेकरी यांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. या नागरिकांना किमान एकवेळचे तरी जेवण मिळावे या उद्देशाने बजाज समूहाच्या वतीने पिंपरी चिंचवडमधील अजमेरा कॉलनी येथील इस्कॉनच्या श्रीमती रुपा राहुल बजाज अन्नामृत केंद्रात रोज सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांसाठी खिचडी वाटप करण्यात येत आहे.

क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत पिंपरी महापालिका क्षेत्रात 38 पथके

एमपीसी न्यूज – राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहे. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. त्यांच्यामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जाते. राज्यभरात सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये 2455 पथके सर्वेक्षणाचे काम करत आहेत. कालपर्यंत सुमारे 9 लाख 25 हजार 828 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती […]

अनावश्यक बाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई; पोलिसांची सर्व सोसायट्यांना नोटीस

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत कलम 144 नुसार संचारबंधीचा आदेश लागु करण्यात आला आहे. सर्व सोसायटी धारकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काही सूचना केल्या आहेत. यामध्ये अनावश्यक बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करण्यात आला असून तशी नोटीस देण्यात आली आहे.तसेच जर कोणी बाहेर आढळल्यास […]

1718 जण ‘होम क्वारंटाईन’, सहा लाख नागरिकांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1718 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील 6 लाख 34 हजार 264 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या एकाला घरी सोडण्यात आले आहे. तर, आज संशयित 26 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 420 […]

आता 'आरटीओ' ही देणार डिजीटल पास; तेही फक्त अर्ध्या तासांत

पुणे : अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या वाहनांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही (आरटीओ) डिजीटल (ई- पास) देण्यास शनिवारपासून सुरवात झाली आहे. ही सेवा अहोरात्र सुरू राहणार असून किमान अर्ध्या तासात चालकांना हे पास ऑनलाईन पद्धतीने मिळतील.

महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने हटविले जाऊ शकते लॉकडाऊन : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –   चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या प्राणघातक विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात हा विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून मोदी सरकारने देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला जो 14 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत आता लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकारांनी परिस्थितीशी सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटविण्याची चिन्हे आहेत.

मोदी सरकारचं मोठं पाऊल ! आता 50 कोटी लोकांची ‘फ्री’मध्ये होईल ‘कोरोना’ टेस्ट अन् उपचार देखील

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देश कोरोना विरोधात लढत आहे यावर बोलताना केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची चाचणी आणि उपचार आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. असे असले तरी सरकारी रुग्णालयात कोरोनाची चाचणी आणि उपचार मोफत होत आहेत. आता सरकारच्या या योजनेतंर्गत 50 कोटी पेक्षा जास्त लोक खासगी लॅबमध्ये कोविड -19 ची मोफत चाचणी करुन घेऊ शकतात. या योजनेतंर्गत रुग्णालयात येणाऱ्यांची कोविड – 19 ची चाचयमी आणि उपचार एकदम मोफत केली जाईल.

आता घरीच बनवा मास्क; केंद्राकडून मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – ‘कोविड 19’च्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीत वाढ झाली. त्यामुळे चेहऱ्यावरचा मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सची बाजारात कमतरता निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी, केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने घरी मास्क बनवण्याविषयी पुस्तिका जारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी फेस मास्क वापरावा, अशी मागणी दुकाने आणि सेवांकडून केली […]

केंद्र सरकारची ‘एचए’ला 164 कोटीची मदत, कामगारांचे थकित वेतन, निवृत्तीवेदन अदा

एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनीला (‘एचए’) केंद्र सरकाराने कोरोनाच्या संकटात दिलासा दिला आहे. 163 कोटी 85 लाख रुपयांची मदत कंपनीला केली आहे. या रकमेतून 501 कामगारांचे फेब्रुवारी 2020 पर्यंतचे 29 महिन्यांचे थकीत वेतन आणि 116 कामगारांना मार्च 2020 अखेरची स्वच्छानिवृत्ती देण्यात आली आहे. ‘एचए’ मजदूर संघाने पंतप्रधान नरेंद्र […]

तब्बल सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या लढ्यासाठी राज्य सरकार सज्ज असून त्यासाठी सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध असल्याची माहिती टोपे यांनी दिली. राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

आगामी धार्मिक उत्सवाच्या पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज –  ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे. त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावे. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याच रात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे. राज्यात […]

‘डीआरडीओ’कडून सॅनिटायझर सिलिंडर

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ)तर्फे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेअंतर्गत सार्वजनिक जागेच्या निर्जंतुकरणासाठी सॅनिटायझर सिलिंडरची निर्मिती करण्यात आली आहे. 

स्वदेशी टेस्टींग किटसाठी एक पाऊल पुढे

पॉलिमर स्वॅबची निर्मिती; ‘सी-मेट’च्या शास्त्रज्ञांची कामगिरी
पुणे - देशात सध्या कोरोनासाठी मोठ्या प्रमाणार ‘टेस्टिंग कीट’ची आवश्‍यकता आहे. जगभरातच कोरोनचे संकट असल्याने ही किट आणि त्यासाठी आवश्‍यक इतर साहित्याचा पुरवठा खंडित झाला आहे. यावर उपाय म्हणून देशभरातील वैज्ञानिक आणि डॉक्‍टर स्वदेशी कीट विकसित करत आहेत. अशा किटमध्ये व्यक्तीच्या स्वॅबचा नमुना घेण्यासाठी आवश्‍यक ‘पॉलिमर स्वॅब’ची निर्मिती करण्यात पुण्यातील संशोधकांना यश आले आहे. 

एका दिवसात 180 जणांवर कारवाई

पिंपरी  – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचारबंदीतही गुटख्याची वाहतूक; 60 हजारांचा माल वाकडमधून जप्त

पिंपरी – वाकड परिसरात गुरुवारी (दि. 2) छापा घालून 60 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला शुक्रवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषेश म्हणजे शहरात अवैध धंदे बंद करण्याची मागणी करणाऱ्या अपना वतन संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वडिलांनाच चोरून गुटखा विक्री करताना अटक झाल्याने शहरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शासनाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन

संभ्रमावस्था दूर; दोन टप्प्यात दिली जाणार रक्कम

पिंपरी – महापालिका कर्मचाऱ्यांचा गेल्या चार दिवसांपासून लांबलेल्या वेतनाबाबत आज (शनिवारी) अंतिम निर्णय घेण्यात आला. शासनाच्या आदेशानुसारच वेतन दिले जाणार असून, वर्ग एक व दोनच्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के, वर्ग तीन 75 टक्के तर चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन दिले जाणार आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

ठेकेदारी तत्वावरील मजुरांना बोलविणे चुकीचेच – महापौर

पिंपरी – सध्या “करोना’मुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्यामुळे आरोग्य विभागाने ठेकेदारांच्या कामगारांना कामावर बोलाविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाची माहिती घेऊन योग्य ते बदल करण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.