Pages

निवारा केंद्रांवरील कोरोनाचे संकट दूर, एकाही बाधिताची नोंद नाही

पिंपरी - शहरातील स्थलांतरित मजूर, बेघर आणि निराधार लोकांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांत सुदैवाने एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. या केंद्रांत सध्या सुमारे २४१ स्थलांतरित मजूर, बेघरांना आश्रय देण्यात आला आहे. 

लॉकडाउनमुळे वाढली पिंपरी शहरात टॅंकरची मागणी

पिंपरी - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढविला असतानाच वाढलेली पाण्याची तहान भागविण्यासाठी शहरातील सोसायट्यांकडून करण्यात येणाऱ्या टॅंकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउनमुळे सदस्यांची संख्या अधिक काळ घरातच राहावे लागत असल्याने पाण्याच्या वापरात वाढ झाली आहे. परिणामी पाण्याची मागणीही त्या प्रमाणात वाढत आहे. 

पिंपरीतील एकाचा मृत्यू; पाॅझिटिव्ह संख्या 31

पिंपरी - शहरातील आणखी दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे बाधितांची संख्या 31 झाली. तर, एका 42 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पिंपरीतील सील केलेल्या भागात आदेशाची ऐसीतैसी

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने शहरातील काही भाग सील केलेला आहे. संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू आहे.‌ मात्र त्याकडे नागरिक गांभीर्याने पहात नसल्याचे चित्र आहे. घरात बसण्याऐवजी विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. गल्ली, मैदान अथवा लगतच्या रिकाम्या शेतात खेळताना दिसत आहेत. 

महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास प्रारंभ

पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराभोवती करोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार शनिवारी (11 एप्रिल) रात्री 11 वाजल्यापासून दापोडी, कासारवाडी परिसर “सील’ करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग “सील’ असणार आहे. तसेच शुक्रवारपासून (10 एप्रिल) भोसरीतील काही भाग सील केला आहे. पाच दिवसांपूर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला होता. शनिवारपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील सात भाग “सील’ केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प

इंडस्ट्री, लघुउद्योजक, सोने-चांदी, वाहन, बांधकाम बाजारपेठा ठप्प
पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दरमहा हजारो कोटींची उलाढाल असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची संपूर्ण उलाढाला “करोना’मुळे ठप्प झाली आहे. शहरातील औद्योगिक वसाहत, लघुउद्योजक, मोठे उद्योजक लॉकडाउनमुळे अक्षरश: चिंतेत पडले आहेत. सोने चांदीसह वाहन, बांधकाम बाजारही पूर्णपणे बंद झाला आहे. 30 एप्रिलनंतर आणखी लॉकडाउन वाढण्याची भीती उद्योजकांना सतावत असून, लॉकडाउन वाढल्यास औद्योगिक वसाहत अक्षरश: कोलमडून जाईल, अशी शक्‍यता अनेकांकडून वर्तविण्यात येत आहे.

‘वाहन मालकांनो, पुण्यात शेतीमाल घरपोच द्यायचाय, मग किसान हेल्पलाईनवर नोंदणी करा!’

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये शेतमाल घरपोच देण्यासाठी छोट्या वाहनधारकांनी (3 चाकी, 4 चाकी, पिकअप वाहन) अथवा वाहनमालकांनी कृषी पणन मंडळाच्या किसान हेल्पलाईनवर (1800-233-0244) नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी माहिती राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली आहे. ज्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व शेतमाल पुरवठादार यांना अत्यावश्यक सेवा म्हणून शहरी भागात शेतमालाचा […]

दहावीचा भूगोलचा पेपर रद्द; नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द!

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचा भुगोल आणि कार्य शिक्षण हे दोन पेपर रद्द करण्यात आले आहे आहेत, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षाही रद्द केल्याची माहिती गायकवाड यांनी दिले. शालेय शिक्षण […]

असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार निवृत्तीवेतन; सहकार खात्याचा सोसायट्यांना 'हा'आदेश

पिंपरी - असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना निवृत्तीवेतन मिळावे, म्हणून केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने अशा कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शहरातील सोसायट्यांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार सोसायट्यांकडून त्यांच्या सोसायट्यांमध्ये स्वयंपाक, स्वच्छता, सुरक्षारक्षक इ. कामे करणाऱ्यांची नोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. 

महत्वाचं ! भविष्यात ‘आरोग्य सेतू’ App चा वापर E-Pass म्हणून केला जाऊ शकतो

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत सरकारने लोकांना कोरोनापासून बचावासाठी आरोग्य सेतू नावाचे अ‍ॅप लाँच केले होते. या अ‍ॅपला एका आठवड्यात जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले होते. जर आपण संशयित भागात प्रवेश केला तर या अ‍ॅपद्वारे सूचित केले जाते. हे एक लोकेशन आधारित कोरोना विषाणू ट्रॅकर अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा उपयोग ई-पास म्हणून देखील केला जाऊ शकतो.