Saturday, 18 August 2012

उच्चदाब वीजतारांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन चार वर्षाचा मुलगा जखमी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32456&To=9
उच्चदाब वीजतारांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन चार वर्षाचा मुलगा जखमी
चिंचवड, 17 ऑगस्ट
थेरगावच्या डांगेचौकातील एका इमारतीच्या जिन्याजवळून जाणा-या उच्चदाब वीजतारांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन एक चार वर्षाचा मुलगा जखमी झाला. ही घटना थेरगाव येथील डांगे चौकाजवळील सोनिगरा नावाच्या इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. 17) संध्याकाळी पावणेचारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात बॉम्बस्फोट झाल्याच्या शक्यतेने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. घटनेची माहिती मिळताच श्वानपथकासहित बॉम्ब शोधक पथक आणि वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासनंतर हा बॉम्बस्फोट नसून अपघात होता असा निर्वाळा पोलिसांनी दिल्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

Hinjewadi cops arrest three for molesting artiste at Sus Khind

Hinjewadi cops arrest three for molesting artiste at Sus Khind: PUNE: The Hinjewadi police have arrested three youths for allegedly molesting a female artiste of a group, which was returning to Mumbai after a performance in Susgaon during the dahi-handi celebrations on Friday.

'त्या' मोर्चात सहभागी झाल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई

'त्या' मोर्चात सहभागी झाल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई: पिंपरी -&nbsp अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या वतीने येत्या गुरुवारी (23) आयोजित महामोर्चात कोणी नगरसेवक सहभागी झाल्यास त्यांच्यावर महापालिका कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी 'अ' प्रभागात चार गुन्हे

अनधिकृत बांधकाम प्रकरणी 'अ' प्रभागात चार गुन्हे: पिंपरी - महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे वारंवार जाहीर करूनही, अशी बांधकामे सुरूच असल्याने महापालिका प्रशासनाने या बांधकामांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. "अ' प्रभाग हद्दीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या वतीने देहूरोड पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 15) चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पिंपरीत विद्यार्थी-पोलिसांची बैठक

पिंपरीत विद्यार्थी-पोलिसांची बैठक: पिंपरी -&nbsp मुंबईतील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील परराज्यातील विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनाची बैठक वरिष्ठ पोलिस अधिकारी घेत आहेत.

एकेरी वाहतूक प्रस्ताव बारगळणार?

एकेरी वाहतूक प्रस्ताव बारगळणार?: पिंपरी -&nbsp येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून लिंक रस्त्यावर जाण्यासाठी वाहनचालकांना मनाई करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावावर नागरिकांकडून मोठ्या संख्येने आक्षेप व हरकती घेण्यात आल्या आहेत.

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे: पिंपरी -&nbsp भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटक करण्याची तरतूद राखून ठेवण्यात आली आहे.