Sunday, 16 September 2012

"सकाळ नाट्यरंग' स्पर्धेसाठी आज चिंचवडमध्ये कार्यशाळा

"सकाळ नाट्यरंग' स्पर्धेसाठी आज चिंचवडमध्ये कार्यशाळा: पिंपरी - सकाळ सोशल फाउंडेशनमधील सकाळ सांस्कृतिक मंचच्या वतीने पुढील महिन्यात "सकाळ नाट्यरंग' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

पिंपरी-स्वारगेट मेट्रोचा मार्ग मोकळा

पिंपरी-स्वारगेट मेट्रोचा मार्ग मोकळा: पुणे - दिल्ली मेट्रो प्रकल्पाने तयार केलेल्या अहवालास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिल्यामुळे वनाज ते रामवाडीपाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटदरम्यान मेट्रो प्रकल्प उभारण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

शहरातील खड्डे चार दिवसांत बुजवा

शहरातील खड्डे चार दिवसांत बुजवा: पिंपरी - गणेशोत्सव जवळ आला असून, शहरात पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, अशी तक्रार महापौर मोहिनी लांडे यांनी आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली. त्यावर शहरातील खड्डे चार दिवसांत बुजवा, असे आदेश आयुक्‍तांनी प्रशासनाला दिले. 

कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू

कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू: हिंजवडी - ""गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या घरांवर बुलडोझर फिरणार असेल, तर केवळ शहर बंद करून थांबणार नाही तर वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू,'' असा इशारा शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारला दिला.

चिंचवडमध्ये उद्या "लेक लाडकी' फेरी

चिंचवडमध्ये उद्या "लेक लाडकी' फेरी: पिंपरी - स्त्रीभ्रूणहत्या, महिला व मुलींवरील अत्याचार, त्यांची सुरक्षितता हे प्रश्‍न गंभीर होऊ लागले आहेत. त्यामुळे समाजपरिवर्तनाला व महिला सबलीकरणाला हातभार लावण्यासाठी "सकाळ' मधुरांगण व लायन्स क्‍लब ऑफ पुणे दुर्गाटेकडी यांनी पुढाकार घेतला आहे. या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. 17) "लेक लाडकी' ही महिला सबलीकरण फेरी काढण्यात येणार आहे. महिलांनी या फेरीमध्ये गटागटाने सहभागी होऊन समाजपरिवर्तनाला हातभार लावण्याचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

आयुक्तांच्या "साफसफाई'मुळे शिस्तबद्ध कारभाराची प्रचिती

आयुक्तांच्या "साफसफाई'मुळे शिस्तबद्ध कारभाराची प्रचिती: आयुक्तांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा या पूर्वीचा कारभार "रेस झोन' म्हणून जाहीर करायचे बाकी होते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to seek revised metro plan

Pimpri Chinchwad Municipal Corporation to seek revised metro plan: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will prepare a revised proposal for the metro project with changes to accommodate the new flyovers as well as extension of certain routes.