Saturday, 21 December 2013

Property tax defaulters in PCMC areas to face the music

Taking a leaf out of the Pune Municipal Corporation's book, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has employed 10 bands to play music outside the houses of property tax defaulters.

Open DP boxes pose major threat

PIMPRI: Many Distribution Point (DP) boxes of the Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) are lying dangerously open in the Pimpri Camp area.
Open DP boxes pose major threat

मिळकतकर वसुलीसाठी बँडपथकाची नियुक्ती बेकायदेशीर

मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिनव उपक्रम म्हणून दहा बँड पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा उपक्रम बेकायदेशीर आणि राज्यघटनाविरोधी असल्याचे मत नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

शहरात काही ठिकाणच्या रस्त्यावर 'नो पार्किंग '

वाहतूक सुरळीत करण्यासाठी आकुर्डी, चिंचवडगाव आणि पिंपळे सौदागर येथील काही रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून समविषम पार्कीग आणि नो पार्किंग करण्यात आली आहे.

पोलिस व्हेरिफिकेशन ऑनलाइन

पासपोर्टसाठी आवश्यक असलेल्या पोलिस ‘व्हेरिफिकेशन’साठी करावी लागणारी दीर्घ प्रतीक्षा आता थांबणार आहे. पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर लगेचच पोलिस व्हेरिफिकेशनची माहिती शहरातील पोलिस ठाण्यांना ऑनलाइन कळविण्यात येणार आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन संपताना पिंपरीतील आमदारांचे राजीनामे मागे

मुख्यमंत्र्यांवर टीका करत राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेले राजीनामे कोणताही निर्णय होण्याआधीच मागे घेतले.

राजीनामा दिलेले नगरसेवक सांगा

पिंपरी : अनधिकृत बांधकाम प्रश्नी तोडगा निघत नाही, म्हणून आमदारांनी राजीनामा दिल्याची घोषणा करताच, त्यांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४0 नगरसेवकांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. परंतु विषय समित्या, स्थायी समिती सभा, तसेच नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेला अनेक नगरसेवक हजेरी लावत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर महापालिका सभा संपताच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी महापौर मोहिनी लांडे यांची भेट घेतली. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची यादी मागितली. यादी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी महापौरांना कोंडीत पकडले. नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार थांबवा. राजीनामानाट्य पुरे झाले, असेही सुनावले.