त्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी हर्डीकर बोलत होते. या वेळी महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 24 August 2017
मिशन विकास आराखडा
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद केलेल्या २०५ कोटीपैकी ११२ कोटी रुपये ३५ आरक्षणे, ४१ प्रमुख पर्यायी रस्ते आणि उड्डाण पुलांच्या कामांसाठी वर्गीकरणास स्थायी समिती सभेत बुधवारी (ता.२३) मंजुरी देण्यात आली.

2 pythons go missing at zoo run by PCMC
Two pythons have gone missing from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation-run (PCMC) Bahinabai Chaudhary Zoo at Akurdi. The establishment has long lacked basic security, despite an earlier incident of baby crocodiles being stolen. Now, the ...

पिंपरी-चिंचवडमधील प्राणी संग्रहालयातील दोन अजगरांची चोरी
पिंपरी-चिंचवडमधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून दोन अजगर चोरीला गेल्याची घटना घडली. संग्रहालयातून ...

‘स्मार्ट सिटी’वर निबंध स्पर्धा
पिंपरी – भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने “माझी सिटी, स्मार्ट सिटी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
निबंधामध्ये आपले शहर “स्मार्ट’ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा उल्लेख व उपाययोजना नमूद करणे आवश्यक आहे. निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहावा. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रथम क्रमांकास एक हजार, द्वितीय क्रमांकास सातशे, तृतीय क्रमांकाला पाचशे रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.
अत्रे रंगमंदिर नऊ महिने बंद
पिंपरी – पिंपरी प्रभाग क्रमांक 20 मधील आचार्य अत्रे रंगमंदिर स्थापत्य व दुरूस्तीच्या कामासाठी तब्बल नऊ महिने बंद राहणार आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे प्रेक्षागृह बंद असल्याने शाळा, तसेच शहरातील विविध कलाप्रेमींच्या कार्यक्रमाची मात्र तारांबळ उडणार आहे. स्थापत्य व विद्युत विषयक कामांसाठी हे रंगमंदिर बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुबे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार दुसरे सभागृह
दैनिक प्रभातच्या बातमीची घेतली दखल
पिंपरी – महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयासाठी थेरगाव येथील शाळेच्या मूळ इमारतीच्या रचनेत कसलाही बदल होणार नाही. शाळेतील सांस्कृतिक सभागृहाच्या बदल्यात विद्यार्थ्यांसाठी शाळेतच सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पालक किंवा शिक्षकांनी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी दिली. शाळेच्या सभागृहाचा अधिकाऱ्यांनी ताबा घेतला होता. दै. प्रभातने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने सभागृह उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)