Saturday, 14 October 2017

पिंपरी चिंचवड महापालिकेला दिली स्वीडनच्या काऊंसिल जनरल कॅम्पबेल वेल्टलिंड यांच्या शिष्टमंडळाने भेट

स्वीडनचे काऊंसिल जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांनी शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस भेट दिली.
शहराचे महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हार्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सँडविक एशिया कंपनीचे एच.आर. सहर्ष डेव्हिड, अधिकारी निळकंठ पोमण, उपअभियंता सुनील पवार या वेळी उपस्थित होते.

‘वेस्ट टू एनर्जी’ला खासदार आढळरावांची विरोधाची भुमिका

मोशी कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबिवण्याबाबत शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोधाची भूमिका मांडली आहे. प्रकल्पाच्या निमित्ताने शहराचा कचरा पुन्हा मोशीत आणण्याचा प्रयत्न असल्याने त्याला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले ला जाणार आहे. त्याला आपला विरोध असून मोशी, भोसरीकरांना अधिक त्रास सहन करावा लागणार असल्याची भूमिका आढळरावांनी मांडली आहे.

मनसेने फेकला पालिका भवनापुढे कचरा; महापालिका प्रशासनाचा केला निषेध

पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. १३) महापालिकेसमोर ‘कचरा फेको’ आंदोलन केले. आंदोलनात थेट “आयुक्तांचे करायचे काय, खाली डोके  वर पाय” अशा घोषणा देत निषेध करण्यात आला.

New water pipeline from Nigdi to Akurdi

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will lay a new water pipeline from Nigdi to Akurdi as a part of its long-term solution for inadequate and low-pressure water supply problems here. The civic body will also undertake a ...

विशाल नगरचा डीपी रस्ता “स्मार्ट वॉर्डा’ त समाविष्ट करा

पिंपरी – महापालिकेच्या हद्दीलगत प्रभाग क्रमांक 26 मधील विशाल नगर ते बाणेर पुलासह 24 मीटरचा नदीच्या पलीकडील डीपी रस्ता पुणे महापालिकेच्या स्मार्ट वॉर्डात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी या भागाला लागून असलेला पिंपळे निलख येथील डीपी रस्ता देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

निळू फुलें सारखा सच्चा मनाचा माणूस पुन्हा होणे नाही – अशोक सराफ

पिंपरी (प्रतिनिधी):- निळू फुले यांनी अभिनयाच्या क्षेत्रातील ठराविक चाकोरीच्या बाहेर जाऊन आपला अभिनय सादर केला. त्यांनी खर्डा आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राला धरून ठेवलं. निळू फुलेंनी सहकलाकारांना कधीच खालची वागणूक दिली नाही. त्यांच्या सारखा सच्चा मनाचा असा माणूस पुन्हा होणे नाही असे परखड मत जेष्ठ मराठी सिने अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

पुणे - पीएमपीच्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के बोनस आणि 12 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने शुक्रवारी घेतला. त्यासाठी पुणे महापालिका 19 कोटी 26 लाख तर पिंपरी चिंचवड महापालिका 12 कोटी 84 लाख रुपये अनुदान देणार आहे.