त्यांचे नाव पालिकेच्या प्रत्येक पत्रिकेत छापलेले असते, मात्र ते कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. सांगवी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हजेरी लावली. चिंचवड नाटय़गृहात झालेल्या 'गणेश फेस्टिव्हल'च्या कार्यक्रमासाठी ते आले होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 24 October 2017
सात हजाराहून अधिक घरे पिंपरी प्राधिकरण बांधणार
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून येत्या तीन वर्षांत विविध पेठांमध्ये सात हजारापेक्षा जास्त घरांची निर्मिती केली जाणार आहे. या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यामध्ये वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये सध्या ७९२ ...
विकासातही नागरी सहभाग, दहा लाखांपर्यंतची कामे शहरातील नागरिकांना सुचविता येणार
पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पुणे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्थानकही मेट्रोशी जोडणार
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलाही सामावून घेण्याचा निर्णय सोमवारी झाला. त्यामुळे मेट्रो स्थानकांभोवतालच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात आता रेल्वेचाही समावेश झाला आहे. परिणामी लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही दोन्ही शहरांतून धावणाऱ्या मेट्रोतून प्रवास करू शकतील.

खडीच खडी चोहीकडे; रस्ता गेला कुणीकडे?
पिंपरी - निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या सहा महिन्यातच चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबराचा थर पूर्णपणे निघून गेला असून त्याखालील खडी सर्वत्र पसरली आहे. परिणामी, दुचाकीस्वारांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

जागरूकता वाढली; प्रदूषण घटले
पिंपरी - शहरातील नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूकता आली असल्याचे चित्र दिवाळीदरम्यान पाहायला मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दोन ठिकाणी तीन ते चार डेसिबलने कमी झाल्याचे चाचण्यांमधून समोर आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी सांगितले.
पिंपरी शहरात आता पोर्टेबल टॉयलेट
पिंपरी - देशपातळीवर स्वच्छ शहर स्पर्धेत घसरलेला दर्जा सावरण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ऑटोमॅटिक टॉयलेट’नंतर पोर्टेबल टॉयलेटची मदत घेण्यात आली आहे. २२ लाख लोकसंख्येच्या शहरात अद्यापही उघड्यावर शौच केली जात असल्याने ‘ओडीएफ’च्या मार्गातील हा अडथळा दूर करण्यासाठी झोपडपट्ट्यांत ही पोर्टेबल टॉयलेट बसविण्यात आली आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)