Thursday, 9 November 2017

[Video] टेंडर चा पण अजब इत्तेफाक...!

पिंपरी-चिंचवड मनपाचा अजब योगायोग

मोशीत अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेचा हातोडा

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेकडून कारवाई सुरु केली आहे. आज पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिर भुईसपाट केले.

क्‍लिष्ट प्रक्रियेमुळेच अनधिकृत बांधकामे

पिंपरी - बांधकाम परवाना देण्याची प्रक्रिया वेगवान आणि सोपी केल्याची माहिती ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी ‘सकाळ’ला दिली. तथापि, क्‍लिष्ट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे नागरिक अनधिकृत बांधकाम करण्यास प्रवृत्त होत असल्याचे स्थानिक बांधकाम कंत्राटदारांनी स्पष्ट केले.

Parents must carry ID cards to pick up kids from school

Pune: While picking up your child from school, do not forget to carry the school-issued identity card. Without the ID, the school may very well refuse to let your child go home with you.

ना पाटी, ना खडू हाती पोछा नि झाडू

पिंपरी - फरशी पुसणे, पाणी भरणे, झाडू मारणे, भिंती-छपराला रंग देण्याचे काम विद्यार्थी (प्राथमिक) करतात का, याचे उत्तर निश्‍चितच नाही, असेच आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या हिंजवडीतील शाळेत ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडून करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. याबाबत शिक्षिकांकडे विचारणा केली असता, जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडूनच करून घ्यावी लागत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

‘सकाळ’मुळे आयुष्याला कलाटणी

पिंपरी - मुलीच्या शाळेची फी भरायची कशी, शस्त्रक्रियेला पैसे कोठून आणायचे, शस्त्रक्रियेला सुटी घेतल्यास घर कसे चालवायचे, कदाचित आपल्याला काही झाल्यास मुलगी आणि आई-वडिलांकडे कोण पाहणार? असे अनेक प्रश्‍न माझ्यासमोर होते. नैराश्‍य येत होते; मात्र ‘सकाळ’मध्ये माझ्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली आणि आयुष्यालाच कलाटणी मिळाली. एका दिवसात सर्व समस्यांचे निराकरण झाले. जीवनाच्या निर्णायक क्षणी ‘सकाळ’ पाठीशी उभा राहिला. यामुळे मी ‘सकाळ’चे सदैव ऋणी राहीन, अशी भावना रोझमेरी जोसेफ यांनी व्यक्‍त केली.

पिंपरी-चिंचवडला गुरुवारी संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद

पिंपरी – निगडी प्राधिकरण येथील सेक्‍टर क्रमांक 23 मधील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे येत्या गुरुवारी (दि. 9) सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.