पिंपरी-चिंचवड शहराच्या दक्षिण व उत्तर विभागास जोडणार्या कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ विकसित केले जाणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मेट्रो, एसटी., पीएमपीएल बस, लोकल-रेल्वे आणि खासगी रिक्षा व टॅक्सी उपलब्ध होणार आहे. हे उद्योगनगरीतील पहिले अद्ययावत एकत्रित प्रवासी वाहतूक स्थानक ठरणार आहे.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 16 May 2018
एचए जमिनीचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत
पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी विभाग (पीएफ) कार्यालयाने हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनी (एचए) कडे मागणी केलेल्या साडेतीन एकर जमिनीचा प्रस्ताव अद्याप पीएफच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाकडे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय बोर्डाने हिरवा कंदील दिल्यानंतर तीन महिन्यांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

विकासकामांच्या गतिमानेसाठी ‘अॅप’
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकासकामांच्या गतिमानतेसाठी ‘एम-पीसीएमसी’ हे नवे अद्ययावत मोबाइल अॅप कार्यान्वित केले आहे. अॅपवर कामापूर्वीचे, काम सुरू असतानाचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्र व व्हिडिओ चित्रीकरण अपलोड करण्याची सक्ती संबंधित ठेकेदार व पालिकेच्या अधिकार्यांना केली आहे. त्यामुळे काम मुदतीमध्ये पूर्ण होऊन नागरिकांना विविध सेवा व सुविधा वेळेवर उपलब्ध होणार आहेत. या अॅपद्वारे शहरातील सर्व विकासकामांची माहिती आयुक्तांसह सर्व अधिकार्यांसह सर्वसामान्य नागरिकांना एका ‘क्लिक’वर समजणार आहे.
पिंपरी शहरात रुजतेय अवयवदानाची चळवळ
पिंपरी - अवयवदानाचे महत्त्व वाढत असून, तरुण वर्गात याबाबत चांगली जागरूकता झाल्याचे समोर आले आहे. गेल्या सात वर्षांत शहरात झालेल्या अवयवदानाचा आकडा ५५०च्या पुढे गेला आहे. वाढत्या सहभागामुळे येत्या काळात ही चळवळ वाढीला लागणार आहे.

सोसायट्यांना टॅंकरचेच पाणी
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून, दागिने मोडून सदनिका घेतल्या. हक्काचे घर म्हणून मिळाले या आनंदात राहायला आले. महापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागामालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती चिखली-मोशी परिसरातील बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील आहे.

शाहूनगर मध्ये भव्य राज्यस्तरीय “महापौर चषक” फुटबॉल स्पर्धा
पिपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने व भाजपा नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे व अनुराधा गोरखे यांच्या पुढाकाराने शाहूनगर येथील बहिरवाडे क्रीडांगणावर दि 15 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान “महापौर चषक” राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होणार आहे.
वाकडच्या वाय जंक्शनच्या उदघाटनाचा घाट कशासाठी; नगरसेवक नाना काटे यांचा संतप्त सवाल
गेल्या काही दिवसापासून वाकड येथील वाय जंक्शनचे काम सुरु होते. अनेक वर्षांनंतर काम पूर्ण झाले असे दाखवून नुकतेच महापालिकेच्या सत्ताधारी भाजपने काम पूर्ण नसतानादेखील अपूर्ण कामाचे मोठ्या थाटामाटात जाहिरात बाजी करून घाईनेघाईने उदघाटन केले. मात्र अवघ्या काही दिवसातच हा ग्रेडसेपरेटर पुन्हा बंद केल्याने उदघाटनाचा घाट कशासाठी असा संतप्त सवाल नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)