Monday, 27 August 2018

भाजपच्या पिंपरीतील चार नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

पिंपरीः कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवक अपात्रतेचे लोण आता राज्यभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातूनच पुण्यातील दोन, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांवरही ही अपात्रतेची तलवार आता लटकू लागली आहे. हे सहाही नगरसेवक सत्ताधारी भाजपचेच आहेत. निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने वा ते मुदतीनंतर दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.

`राष्ट्रवादी'च्या काळातच पिंपरी स्मार्ट; भाजप महापौरांची अप्रत्यक्ष कबुली

पिंपरीः ``पिंपरी चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश होण्यापूर्वीच शहराच्या पिंपळे सौदागर भागात आल्यावर नवी मुंबईत प्रवेश केल्याचा भास होत असे. एवढा विकास येथे झालेला आहे,'' असे सांगताना भाजपचे महापौर राहूल जाधव यांनी हा भाग पूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातच स्मार्ट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली आज दिली. भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या (त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक) पाठपुराव्यामुळेच हा भाग स्मार्ट झाल्याचेही महापौरांनी आवर्जुन सागितले. 

नगरसेवक पत्नीच्या नामकरणाच्या ठरावाची नगरसेवक पतीकडून अंमलबजावणी

पिंपरी : पत्नीने नगरसेविका असताना केलेल्या बस टर्मिनल नामकरण ठरावाचा पाठपुरावा नंतर नगरसेवक झालेल्या त्यांच्या पतीने करून त्याची अंमलबजावणी करून घेतल्याची दुर्मिळ घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. त्यासाठी साडेतीन वर्षे लागली. योगायोगाची बाब म्हणजे त्यावेळच्या या मनसे नगरसेविकेच्या प्रस्तावाला अनुमोदक त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक राहूल जाधव होते. सध्या ते महापौर आहेत. त्यांच्यात हस्ते या बीआरटी सेवा व बस टर्मिनलचे नामकरण नुकतेच (ता.24) झाले

नाशिकफाटा-चाकण मेट्रो प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार

सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने
पिंपरी : पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो धावणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. या दोन्ही मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. हा अहवाल सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. दिल्लीतील सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने हा डीपीआर तयार केला आहे. पहिल्या टप्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार होती. परंतु, मेट्रोचे काम वाढले असून एम्पायर इस्टेटच्या पुलापर्यंत गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी केली होती. त्यासाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर पालिकेने मेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नाशिकफाटा ते चाकण या मार्गावरदेखील मेट्रोे प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने मेट्रोला या दोन्ही मार्गावरील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी पुणे महामेट्रोला तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पिंपरी पालिकेने दिले होते.

Day 2 of BRTS chaos: Other vehicles trespass, buses try to find their way as traffic cops watch

The day after its launch, traffic movement on the Bus Rapid Transport System (BRTS) between Nigdi and Dapodi was far from smooth, as bus drivers remained confused, traffic police remained spectators and officials of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation struggled to manage the route. On Saturday, buses could be seen plying on the BRTS route, then moving out of the designated track, only to make their way back to it after some time.

Bus stop confusion dogs BRTS commuters on Day 1

Utter confusion marked the day one of the much delayed Bus Rapid Transit System (BRTS) service on Pune-Mumbai highway on Friday.

दीड महिन्यात शहरात प्रत्यक्ष पार्किंग पॉलिसी : आयुक्त हर्डीकर

पिंपरी-चिंचवड शहरात क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘पार्किंग पॉलिसी’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या दीड महिन्यात प्रत्यक्ष ती कार्यान्वित होईल. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे वाहतूक रहदारीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. पॉलिसी लागू झाल्यानंतर ठराविक रस्त्यावर वाहने लावण्यासाठी तासानुसार शुल्क द्यावे लागणार आहे.