Tuesday, 16 October 2018

वाहन परवाना नसणारे शेकडो कर्मचारी चालवितात बस

पीएमपीएल डेपोमध्ये बस दुरुस्तीचे काम करणार्‍या तब्बल 976 कर्मचार्‍यांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वाहन चालविण्याचे तंत्र माहिती नसताना आणि परवाना नसताना हे कर्मचारी सर्रास बस चालवित असल्याने प्रशासन अपघात होण्याची प्रतिक्षा करीत आहे का, हा सवाल उपस्थित होत आहे.

भीमसृष्टीचा ऑक्टोबरचाही मुहूर्त हुकला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात त्यांच्या जीवन प्रसंगांवरील म्युरल्स लावून भीमसृष्टी तयार करण्याचे काम अद्याप सुरू आहे. मात्र, अद्याप कांस्य धातूचे सर्व म्युरल्स तयार झालेले नाहीत. किमान दीड महिन्यांचा कालावधी म्युरल्स  बसविण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला भीमसृष्टी तयार करण्याचा सत्ताधारी भाजपाचा संकल्प अपूर्ण राहिला आहे. सध्याचे काम पाहता भीमसृष्टी वर्षअखेरीत डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पुणे महामेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचा समावेश करा; ‘दिशा’च्या बैठकीत महापौरांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोचे काम वेगात सुरु आहे. परंतु, मेट्रोला केवळ पुणे महामेट्रो असे नाव दिले आहे. शहराची स्वतंत्र ओळख असून ती पुसली जाऊ नये. त्यासाठी पुणे महामेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी महापौर राहुल जाधव यांनी आज (सोमवारी)’दिशा’  समितीच्या बैठकीत केली.

मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (दि.19) होणा-या विधी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून विधीच्या मंजुरीनंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.

शहरात दुर्गोत्सवातून घडतेय बंगालचे ‘दर्शन’

एमपीसी न्यूज – शंखनाद, ढोलचा निनाद , अशा मंगलमय वातावरणात बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा उत्सवाला सुरूवात झाली. पाच दिवस चालणारा हा सण आज (सोमवार) अष्टमीपासून सुरू झाला असून दशमीपर्यंत चालणार आहे. दुर्गा मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळीच असल्याने सकाळपासूनच बंगाली पद्धतीच्या पूजाअर्चेनेने शहरात नवरात्रीचा आनंद द्विगुणीत केला. बंगाली बांधवाचे विविध धार्मिक कार्यक्रम दि. 15 ते 19 ऑक्टोबर

MPC News / Pimpri पिंपरी चिंचवड अनधिकृत वृक्षतोडीस विरोध

काटकसरीने पाणी वापरा

पिंपरी - निम्म्या शहराला अपुरा पाणीपुरवठा सुरू असतानाच पवना धरणातही यंदा कमी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. निश्‍चित केलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी शहराला पुरविले जात असल्यामुळे शहरवासीयांनी पाण्याची बचत करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.