Monday, 29 October 2018

आठवडे बाजारचे चिंचवडला उदघाटन

एमपीसी न्यूज – ग्राहक व शेतकरी यांना जोडणार्‍या शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन स्थानिक नगरसेवक  शीतल शिंदे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार किफायतशीर किमतीमध्ये ताजा भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या आठवडे बाजारातून उपलब्ध करण्यात येणार असणार असल्याचे आयोजक व नगरसेवक  शीतल शिंदे यांनी सांगितले.  

MPCB to check air quality for 2 weeks on Diwali

PUNE: The Maharashtra Pollution Control Board (MPCB) has iss .. 


शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादीच जबाबदार

शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन केले नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी फज्जा उडविला. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली. यावर उपाययोजना म्हणून भाजपने आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी आरक्षणासाठी यशस्वी पाठपुरावा करून मंजुरी मिळविली. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना खटकत असल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, असा टोला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना लगावला.

उद्योगनगरीत बसथांब्यांची दुरवस्था; प्रवाशांचे हाल

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये रोज लाखो चाकरमानी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बससेवेचा वापर करतात; मात्र सद्यस्थितीत अनेक बसेसची दुरवस्था तर झाली आहेच, पण बसथांब्यांनाही अवकळा आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून हे बसथांबे त्यांच्यासाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरत आहेत. 

शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, पिंपरीत सामनाच्या अंकाची होळी

पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सामनाच्या अंकाची होळी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उध्दव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

एकनाथ पवारच शहरवासीयांचे खरे ‘नाथ’ : लक्ष्मण जगताप

प्रेम आणि सहाय्य करणा-याचा अनाथांना शोध असतो. अशी व्यक्ती त्यांच्यासाठी ‘नाथ’ असते. शहरातील अशा अनेक गरजू व्यक्तींना एकनाथ पवार यांनी सातत्याने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी एकनाथ पवार त्यांचे ‘नाथ’च आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच भाजपाने त्यांना संधी दिली. त्यांच्यातील नेतृत्व गुणांना हेरून त्यांना महापालिकेत पक्षनेता म्हणून मानाचे आणि तितकेच जबाबदारीचेही पद दिले. हे पद केवळ महापालिकेपुरता मर्यादित नाही. त्यामुळे एकनाथ पवार शहराचेही नेते आणि ‘नाथ’ आहेत, असे मत भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची पिंपरीमध्ये जाहीर सभा

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या ३ नोव्हेंबरला भाजपची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानात दुपारी तीन वाजता हे महासंमेलन होणार आहे.