Friday, 23 November 2018

मध्यरात्री वाढदिवस साजरा केला तर पोलीस घेतील ताब्यात

वाढदिवस म्हटलं की सार्वजनिक रस्त्यावर मांडव टाकून वाढदिवस साजरा केला जात होता. मध्यरात्री केक कापला जात होता, आरडाओरडा आणि जल्लोष केला जात होता. मात्र यापुढे राजकीय नेत्यांसह युवा कार्यकर्ते,नागरिक यांना रस्त्यांवर वाढदिवस साजरा करता येणार नसून मित्रांना डीजेच्या तालावर थिरकता येणार नाही. कारण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास बंदी केली आहे. यासाठी वेळ ठरवली असून रात्री दहाच्या नंतर वाढदिवस साजरा करता येणार नाही.वाढदिवस साजरा केलाच तर एक वर्षाचा करावासाची शिक्षा बर्थ-डे बॉयसह मित्रांना होऊ शकते. या कारवाईचं सामान्य नागरिकांमधून स्वागत होत असून कौतुक केलं जातं आहे. वाकड पोलिसांनी अशा प्रकारची पहिली कारवाई केली आहे.

महापालिका स्थायीची 19 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे 19  कोटी 16 लाख 28 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातांतर्गत डास निर्मुलन उपाय योजनेसाठी औष्णिक धुरीकरण व्हॅन फॉगींगच्या मशीनने करण्याच्या कामासाठी डिझेलवर धावणा-या प्रती दिन चार पिकअप व्हॅन/रिक्षा टेम्पो भाडे तत्वावर पुरविण्यासाठी येणा-या सुमारे एक […]

महापालिकेच्या तिजोरीत 302 कोटीचा महसूल

एमपीसी न्यूज – चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यात मालमत्ता करातून 302.78 कोटी रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोषागरात जमा झाला आहे. 22 नोव्हेंबर 2018 अखेर दोन लाख 45 हजार 650 मिळकतधारकांनी कराचा भरणा केला असून त्यामध्ये सर्वाधिक एक लाख 23 हजार 54 मिळकत धारकांनी 151. 28 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त […]

शहरातील 615 गृहसंस्थांना महापालिकेच्या नोटीसा

एमपीसी न्यूज – दैनंदिन शंभर किलो कचरा निर्माण करणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहसंस्था आणि पाच हजार चौरस मीटर भूखंडावर वसलेल्या एकूण 615 गृहप्रकल्पांना महापालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत नोटीसा बजाविल्या आहेत. गृहसंस्थानी निर्माण होणाऱ्या ओला कच-यावर प्रक्रिया करावी. अन्यथा कचरा उचलला जाणार नाही. याच्या अमंलबजावणीमध्ये चालढकल केल्यास महापालिकेकडून कचरा स्वीकाराला जाणार नाही. तसेच दंडाची आकारणी केली जाईल, असा इशारा […]

पिंपरीत वर्षभरात १४ हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी झाल्याचा दावा

ठेकेदाराला दिलेल्या पैशांवरून महापालिकेत आरोप प्रत्यारोप

पिंपरीत ६०,९९० बेशिस्त चालक


त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त मोरया गोसावी मंदिरात दिपोत्सव साजरा

११ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला मंदिर परिसर

पिंपरी (Pclive7.com):- पवनामाईच्या जलस्पर्शाने पवित्र झालेल्या आणि धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्‍या मोरया गोसावी मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सलग १६ वर्ष दिपोत्सव साजरा होतो हे कौतुकास्पद आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांव्दारे धार्मिक-सांस्कृतिक वारसा नव्या पिढीकडून पुढे चालविण्यास मदत होते. पवना नदीतील पाणी प्रदुषित होत आहे. ते रोखण्यासाठी उपाययोजना करून पावित्र्य जपले पाहिजे. यासाठी शहरातील सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज यांनी व्यक्‍त केली.