निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतचा 4.413 किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रोसाठी पालिका 155 कोटी रूपये खर्च करणार आहे. उर्वरित 1 हजार 150 कोटी रूपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, या उपसूचनेसह या वाढीव मार्गाच्या विस्तृत प्रकल्प आराखडा अहवालास (डीपीआर) पालिका सर्वसाधारण सभेने गुरूवारी (दि.20) मंजुरी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 21 December 2018
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पंकजा मुंडे यांचा चिंचवड दौरा
एमपीसी न्यूज – लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त रविवारी ( दि. 23 डिसेंबर ) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी 5 वाजता शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होईल.
वाहतुकीचे नियम मोडताना सावधान
पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांनो, तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर सावधान! कारण वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. नियम मोडल्यानंतर पोलीस तुमच्याशी वाद न घालता तुमच्या न कळत तुमच्या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र घेऊन तुम्हाला सोडून देतील. मात्र, नंतर दंडाची नोटीस घेऊन पोलीसच आपल्या दारात उभा राहील. गेल्या दहा महिन्यात नियम मोडणाऱ्या दोन लाख ७९ हजार वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारे गोळा केली आहे आणि त्यातील ४६ हजार ७०० वाहन चालकांना देण्याच्या नोटीस तयार झाल्या आहेत. या नोटिसा वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
अध्यापक, कर्मचार्यांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन
पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाच्या शासकीय कार्यालये व महाविद्यालये, शिक्षण संस्थांमधील अध्यापक व इतर कर्मचार्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने ‘तक्रार निवारण समिती’ स्थापन केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन केली असून यामुळे अध्यापक व इतर कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू
पिंपळे सौदागर : येथील साई चौकात असलेली उच्च दाबाच्या (हायटेंन्शन) विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भाजपच्या नगरसेविका निर्मला कुटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला चालना मिळाली आहे. पिंपळे सौदागर येथील साई चौक येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या पूलाच्या शेजारीच उच्चदाबाची विद्युत वाहिनी असल्यामुळे त्याचा मोठा अडथळा निर्माण होत होता. भविष्यात निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी नगरसेविका निर्मला कुटे यांनी तातडीने या वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरु करण्याच्या सुचना संबंधित अधिकार्यांना केल्या. यावेळी विद्युत विभागाचे अधिकारी कावळे उपस्थित होते.
पर्यावरण संतुलित सोसायटीस कर सवलत
पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
चिंचवडगावात ‘हेरिटेज वॉक’
पिंपरी - महापालिकेतर्फे चिंचवडगावातील सुमारे पाच किलोमीटरच्या क्षेत्रात ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यात मोरया गोसावी समाधी मंदिर, हनुमान, कालभैरवनाथ, धनेश्वर, श्रीराम या मंदिरांसह क्रांतिवीर चापेकर वाड्याचा समावेश आहे. यामुळे चिंचवड गावठाणासह परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)