एमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणा-या खेळाडूंचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 17 January 2019
Pimpri : भीमसृष्टीचे आंबेडकर जयंतीला लोकार्पण
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात साकारल्या जाणा-या भीमसृष्टीतील 19 पैकी दोन म्युरल्स बसविण्यात आले आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व म्युरल्स बसविण्यात येणार असून येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला या भीमसृष्टीचे अनावरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.
Pimpri : महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तववादी असणार , आकड्यांचा फुगवटा कमी होणार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019-2020 या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात स्थायी समिती समोर सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी सादर करत आकड्यांचा फुगवटा कमी करणार असल्याची ग्वाही मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी दिली.
ताजा भाजीपाला थेट गृहनिर्माण संस्थेच्या दारात
शेतकऱ्यांची ताजी भाजी पिंपरी चिंचवडमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दारात थेट येणार आहे. जिल्हा सहकारी उपनिबंधक आणि महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ यांच्या समन्वयातून गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतकऱ्यांच्या ताज्या भाजीपाल्याची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाकड येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये शेतकऱ्यांचा माल थेट विक्रीसाठी आणायला सुरुवात झाली आहे.
शास्तीकराच्या घोषणेनंतर पिंपरीत भाजपविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले
राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून शास्तीकराच्या बाबतीत नागरिकांना दिलासा द्यावा, यासाठी भाजपचे स्थानिक नेते प्रयत्नशील होते.
थेट आरटीओकडे तक्रार केल्याने पीएमपी बसची योग्यता रद्द
पुणे : तुटलेले पत्रे, बंद पडलेले दिशादर्शक बल आणि खिळखिळ्या बसमधून सुरू असलेली प्रवासी वाहतूक आरटीओने सोमवारी थांबवली. बसमधील एका प्रवाशाने थेट आरटीओकडे तक्रार केली होती. यानंतर आरटीओ अधिकार्यांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत बस मार्गावर चालवण्यासाठी योग्य नसल्याचे निदर्शनास आल्याने तिचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून पीएमपीला दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे.
गर्दुल्यांवर आता बारिक लक्ष
पिंपरी - भोसरी-नाशिक मार्गावरील अमली पदार्थविरोधी पथक कार्यालयाचे मासुळकर कॉलनीलगतच्या भाजी मंडई आवारात स्थलांतर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. २६ जानेवारीला कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)