अधिकृत थांबे सोडून पीएमपीएमएलचे बस थांबे रिक्षांनी बळकावले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करावा लागत आहे. मात्र, वाहतूक पोलीस गांधारीच्या भूमिकेत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 1 April 2019
Pimpri : उद्योगनगरीचे दहशतवाद कनेक्शन अधोरेखित
एमपीसी न्यूज- जगामध्ये वाढत असलेल्या दहशतवादाच्या उंबरठ्यावरून उद्योगनगरीकडे पहिले असता येथील स्थानिक पातळीवरील दहशतवाद उघड झाला आहे. अतिरेकी भटकळ बंधूंची कुदळवाडी वास्तव्याची शक्यता, शहरात अनेकदा कधी छुप्या तर कधी उघडपणे होणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाया. त्यातच स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असणाऱ्या दहशतवाद्याला नुकतेच चाकण परिसरातून शस्त्रासह केलेली अटक अशा केली होती.
होस्टेलचालकांना ‘जीएसटी’चा दिलासा
पुणे - भाड्याने दिलेल्या रूमला प्रतिदिन एक हजार रुपये भाडे असेल, तर संबंधित उत्पन्नावर आता ‘जीएसटी’ भरावा लागणार नाही. जीएसटी विभागाच्या या निर्णयामुळे देशभरातील होस्टेलचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संगणक टंकलेखन, लघुलेखन संस्थांच्या मनमानीला “चाप’
पुणे – शासकीय संगणक टायपिंग परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत न भरल्यास व अर्जातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेला आहे. याचा संस्थांनी धसकाच घेतला आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने शासकीय संगणक टायपिंग परीक्षा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुड्टस या परीक्षा दरवर्षी घेण्यात येतात. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फी घेण्यात येते.
शहरात 5 ठिकाणी मिळणार ऑनलाइन “पीयूसी’
पुणे – नव्या नियमानुसार वाहनाची “पीयूसी’ अर्थात “पोल्यूशन अंडर कंट्रोल’ प्रमाणपत्र आता ऑनलाइन मिळणार आहे. त्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रक्रियेला काही वेळ जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शहरातील पाच ठिकाणी ही ऑनलाइन यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.
पुणे – मेट्रो कर्मचाऱ्यांच्या संवादासाठी ‘सी-डॅक’ देणार तंत्रज्ञान
पुणे – मेट्रो रेल्वेत कर्मचाऱ्यांना अंतर्गत संवाद साधण्यासाठी नवीन संगणक तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टिम सेंटर फॉर डेव्हपलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कंप्युटिंग (सी-डॅक) तर्फे विकसित केली जात असल्याची माहिती महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिली.
निगडीतील परिमंडळ कार्यालय बंद
पिंपरी चिंचवड ः निगडी येथील परिमंडळ अधिकारी यांचा इलेक्शन ड्युटी व ऑनलाईनच्या नावाखाली नविन दुबार नुतनीकरण व विभक्त शिधापत्रिकेचे कामकाज बंद ठेवून मनमानी कारभार सुरू आहे. दोन-दोन महिने अर्ज करून देखील नागरिकांना शिधापत्रिकेसाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तरी संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)