शहरात करोनाचे एकदम १२ रुग्ण आढळून आले, त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने वेगाने पावले टाकली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 9 April 2020
करोना प्रतिबंधासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ कोटीचे विमा कवच
महापालिकेचा निर्णय : वारसाला नोकरी देण्याचीही तरतूद
पिंपरी – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमणूक केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (बुधवारी) घेण्यात आला आहे. करोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वैद्यकीय, आरोग्य आणि इतर कर्मचाऱ्यांना यामुळे आधार मिळणार आहे. तसेच, दुर्देवी घटना दुर्घटना घडल्यास एक कोटी रुपयांच्या रक्कमेसह त्यांच्या वारसाला पालिकेत नोकरीही दिली जाणार आहे.
पिंपरी – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमणूक केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (बुधवारी) घेण्यात आला आहे. करोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वैद्यकीय, आरोग्य आणि इतर कर्मचाऱ्यांना यामुळे आधार मिळणार आहे. तसेच, दुर्देवी घटना दुर्घटना घडल्यास एक कोटी रुपयांच्या रक्कमेसह त्यांच्या वारसाला पालिकेत नोकरीही दिली जाणार आहे.
शहर पोलिसांनी बनवली सॅनिटायझर व्हॅन; शहरातील 65 चेकपोस्टवरील सर्व कर्मचारी दररोज होणार सॅनिटाइज
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका दिवसात सॅनिटायझर व्हॅन तयार केली असून, गुरुवार (दि. 9) पासून ती सेवेत दाखल होणार आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते बुधवारी (दि. 8) या व्हॅनचे उदघाटन करण्यात आले. या व्हॅनमधून शहरातील 65 चेकपोस्टवरील सर्व कर्मचा-यांचे दररोज निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली […]


SKF गणेश मित्र मंडळातर्फे चिंचवडेनगर येथील गरजूंना मदतीचा हात
पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण जगासह भारत देशही कोरोनाच्या संकटात सापडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर केलायं. मात्र या लॉकडाऊनमुळे सर्वसमान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हातावरचं पोट असणारे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. या परिस्थितीत एक हात मदतीचा या भावनेतून एसकेएफ गणेश मित्र मंडळातर्फे चिंचवडेनगर येथील परप्रांतीय तसेच गरजू नागरिकांना गृहउपयोगी वस्तू व धान्याचे वाटप करण्यात आले.
पिंपरी चिंचवडमधील 'हे' चार भाग आज रात्रीपासून होणार सील
पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील दिघी, घरकुल, खराळवाडी व थेरगाव अशा चार भागातील काही परिसर बुधवारी (ता. ८) मध्यरात्री १२ वाजेपासून सील करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाशी समन्वय ठेवू - आयुक्त
पिंपरी - 'शहरातील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधला जाईल. त्याद्वारे, अडचणी सोडविल्या जातील, " असे आश्वासन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.
Subscribe to:
Posts (Atom)