Sunday, 3 May 2020

Coronavirus Lockdown 3.0 : पुणे अन पिंपरी-चिंचवड एकच झोन, शहराचे कोणतेही zone पडणार नाहीत, कोणत्या देखील सवलती नसतील

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवताना सरकारने देशात तीन झोन तयार केले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन या तीन विभागात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात कोणताही झोन लागू होणार नाही. दोन्ही शहरात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी पूर्ववत लागू राहणार असून कोणतीही सवलत मिळणार नाही

COVID-19 PCMC War Room | 2 May - Zone wise statistics


आपल्या शहरातील कॅटेनमेंट झोन घोषित केलेली ही आहेत 20 ठिकाणांची यादी


Coronavirus: गुड न्यूज! पिंपरी चिंचवडमध्ये 7 बालकांनी कोरोनावर केली मात

संपूर्ण देशात सध्या कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. 

आता भोसरीतील ‘नारी’तही कोरोनाची चाचणी

एमपीसी न्यूज ( गणेश यादव ) : भोसरी-एमआयडीसी परिसरातील एड्‌सबाबत स्वतंत्रपणे संशोधन करणा-या राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्थेत (नारी) आता कोविड-19 म्हणजेच कोरोनाची चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. ‘आयसीएमआर’ने दोन दिवसांपुर्वी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. याची पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठी मदत होणार आहे. वायसीएमपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘नारी’त कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याने त्याचे रिपोर्ट लवकर […]b

पिंपरी चिंचवडमधील आजपर्यंतच्या ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांची संख्या ११५ वर पोहचली; जुनी सांगवी, पिंपळे गुरवचा काही परिसर ‘सील’ होणार..!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी दिवसभरात एकही कोरोनाचा ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळला नव्हता. मात्र काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात पिंपळे गुरव आणि जुनी सांगवी परिसरातील २ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंत कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांची संख्या ११५ वर पोहचली असून ५२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहराबाहेरील दोन रूग्णांसह ५ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुनी सांगवी, पिंपळे गुरवचा काही परिसर आज (दि.०२) रात्रीपासून सील करण्यात येणार आहे. 

Pimpri Chinchwad: 'Implement Baramati pattern for controlling the spread of covid-19'