Pages

Thursday, 19 July 2012

पाडापाडी'वरुन राजकारण तापले ; आयुक्तांकडून तात्पुरता दिलासा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31676&To=10
'पाडापाडी'वरुन राजकारण तापले ;
आयुक्तांकडून तात्पुरता दिलासा
पिंपरी, 17 जुलै
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईमागे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोप करत कारवाई न थांबल्यास महापालिकेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. तर दुसरीकडे महापौरांनी केवळ आमदार लांडे समर्थकांसमवेत आयुक्तांची बैठक घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली आहे. तथापि आयुक्तांनी शासनाच्या आदेशानंतरच कारवाई थांबविण्याचे स्पष्ट करत आदेश आणण्यासाठी महापौरांना पाच दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे शहरवासियांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment