Pages

Friday, 21 September 2012

उपमुख्यमंत्र्यांच्या 'कॉनव्हाय'मधील रुग्णवाहिकेला जिल्हा रुग्णालयाचा 'ब्रेक'

उपमुख्यमंत्र्यांच्या 'कॉनव्हाय'मधील रुग्णवाहिकेला जिल्हा रुग्णालयाचा 'ब्रेक' !
पिंपरी, 19 सप्टेंबर
औंध येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या मनमानीचा फटका दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आहे. अपु-या मनुष्यबळाचे कारण पुढे करत उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात रुग्णवाहिका देण्यास जिल्हा शल्य चिकित्सक विनायक मोरे यांनी तोंडी मनाई आदेश काढला आहे. त्यामुळे जिल्हा दौरा करताना रुग्णवाहिका नसलेला ताफा घेऊन फिरण्याची वेळ उपमुख्यमंत्र्यांवर आली आहे. थेट लोकप्रतिनिधींच्याच सुरक्षेशी खेळण्याच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment