Pages

Thursday, 6 September 2012

अवैध बांधकामांच्या सेवा-सुविधा बंद करण्याचा प्रस्ताव

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32965&To=9
अवैध बांधकामांच्या सेवा-सुविधा बंद करण्याचा प्रस्ताव
पिंपरी, 5 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना यापुढे पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, दिवाबत्ती आदी मुलभूत सेवा सुविधा कदापी पुरवू नये असे धोरण आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी निश्चित केले आहे. एवढेच नव्हे तर, महापालिका हद्दीतील बांधकामांना विद्युत जोड देण्यापूर्वी 'महावितरण’ने लाभार्थ्याकडून महापालिकेचा ना हरकत दाखल मागावा, अशी विनवणीही केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (दि. 7) होणा-या विधी समिती सभेपुढे सादर करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment