Pages

Sunday, 9 September 2012

पालिकेच्या सौजन्याने कुदळवाडीत 'मोटोक्रॉस'चा थरार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33034&To=10
पालिकेच्या सौजन्याने कुदळवाडीत 'मोटोक्रॉस'चा थरार
पिंपरी, 7 सप्टेंबर
कुदळवाडी, चिखली, मोशी प्राधिकरणाच्या परिसरातील सातत्याने वाढत्या नागरिकरणामुळे कुदळवाडीतून जाणा-या स्पाईन रोडवर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वाहतुकीमुळे याच रस्त्यावरील कुदळवाडी चौकात वाढत्या अपघातांचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने रस्त्यावर खड्डा खोदून गेल्या दीड महिन्यापासून हा रस्ता बंद केला आहे. मात्र, बंद रस्त्यामुळे येथील रहिवाश्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून येथे उड्डाणपुल बांधण्याची मागणी कुदळवाडीतील रहिवाश्यांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment