Pages

Thursday, 11 October 2012

पुणे-मुंबई महामार्गावर खिळे टाकण्याचा 'उद्योग' सुरूच !

पुणे-मुंबई महामार्गावर खिळे टाकण्याचा 'उद्योग' सुरूच !
पिंपरी, 9 ऑक्टोबर
पुणे-मुंबई महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याचा उद्योग पुन्हा सुरू झाला असून आज चिंचवड येथील एम्पायर इस्टेटसमोर टाकण्यात आलेल्या शेकडो खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांसमवेत रस्त्यावर मोठ्या संख्येने पडलेले खिळे गोळा केले. खिळे टाकण्याच्या उद्योगाला पायबंद केंव्हा बसणार असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment