Pages

Tuesday, 6 November 2012

इमारतीमधील फटाक्याच्या साठ्याला आग 35 दुचाक्या जळाल्या

इमारतीमधील फटाक्याच्या साठ्याला आग 35 दुचाक्या जळाल्या
पिंपरी, 31 ऑक्टोबर
तळवडेच्या गणेशनगर भागातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या फटाक्याच्या साठ्याला मंगळवारी (ता.30) मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून या इमारतीमधील 35 दुचाक्या जळून खाक झाल्या. तर या इमारतीमधील काही फ्लॅटला या आगीची झळ पोचल्यामुळे हे फ्लॅट काळवंडून गेले असून यामधील काही सामानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment