Pages

Wednesday, 19 December 2012

मेट्रो धावणार कात्रजपर्यंत

मेट्रो धावणार कात्रजपर्यंतस्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यास आणि त्यासाठी दहा टक्के खर्च करण्यास मान्यता देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. हाच मार्ग पुढे कात्रजपर्यंत वाढविण्यात यावा, अशी उपसूचना मांडून ती मंजूर करण्यात आली. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. एकूण साडेसोळा किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यापैकी 9.44 किलोमीटर पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणार आहे. त्यापैकी 4.66 किलोमीटर भूमिगत राहणार आहे. 

मेट्रो धावणार कात्रजपर्यंत

No comments:

Post a Comment