Pages

Sunday, 30 December 2012

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या इमारतीला मुहूर्त

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या इमारतीला मुहूर्त हिंजवडी - तब्बल दहा वर्षांच्या कालखंडानंतर अखेर हिंजवडी पोलिस ठाण्याच्या नियोजित इमारतीला मुहूर्त मिळाला. जागतिक दर्जाच्या आयटी पार्कला साजेल अशा भव्य दुमजली वास्तूचे भूमिपूजन पोलिस गृहनिर्माण विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दीधित यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम एक वर्षात पूर्ण होणार असल्याचे दीक्षित यांनी या वेळी सांगितले. 

No comments:

Post a Comment