तरुणाई होणार 'पर्यटनदूत': राज्यातील पर्यटनस्थळांच्या विकासामध्ये तरुणांची थेट मदत उपलब्ध व्हावी, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आता राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सहकार्याने राज्यभरात पर्यटन क्लब स्थापन करणार आहे. पर्यटनस्थळांच्या संवर्धनासोबतच त्यांच्याविषयीची जनजागृती करण्याची जबाबदारी या निमित्ताने स्थानिक पातळीवरील कॉलेजांमधील युवक-युवती पेलणार आहेत.
No comments:
Post a Comment