Pages

Friday, 1 March 2013

पिंपरी पालिकेचा २,0२४ कोटींचा अर्थसंकल्प

पिंपरी पालिकेचा २,0२४ कोटींचा अर्थसंकल्प: पिंपरी। दि. २८ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २0१३-१४ या आर्थिक वर्षाचा २,0२४ कोटी १३ लाख ९४ हजार ४00 रुपयांचा, ९७ कोटी ८२ लाख आरंभीच्या शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त श्रीकर परदेशी यांनी आज स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी यांच्याकडे सादर केला. जेएनएनयूआरएम योजनेच्या १,२२४ कोटींसह हा अर्थसंकल्प ३,२४८ कोटींवर पोहोचला आहे. मिळकतकरात १ टक्का वाढ सुचविण्यात आली आहे. पर्यटनविकासाला चालना, समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य, अशी अर्थसंकल्पात तरतूद आहे.

महापालिका स्थायी समिती सभागृहात आयुक्त परदेशी यांनी स्थायी समिती सभापती शेट्टी यांना अर्थसंकल्प सादर केला. शेट्टी यांनी ४ मार्चपर्यंत अभ्यासासाठी वेळ मागितला असून, त्यानंतर तो मंजूर केला जाईल.

No comments:

Post a Comment