Pages

Monday, 18 March 2013

विजेचा शॉक बसून मुलाचा मृत्यू

विजेचा शॉक बसून मुलाचा मृत्यू: पिंपरी । दि. १७ (प्रतिनिधी)

हातातील सळई अतिउच्च दाबाच्या वीजवाहक तारेच्या संपर्कात आल्याने शॉक बसून मुलाचा मृत्यू झाला. ओटास्किम लगतच्या त्रिवेणीनगर कॉर्नर परिसरात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सुनील रामचंद्र कांबळे (१५, रा. ओटास्किम, निगडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो एका केटर्सकडे कामाला होता. हातात लोखंडी सळई घेऊन तो ओटास्किमहून त्रिवेणीनगरकडे चालला होता. मातीच्या उंचवट्यावरून जात असताना त्याच्या हातातील सळई अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेच्या संपर्कात आली. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून सुनील बेशुद्ध पडला. त्याला तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment