Pages

Wednesday, 20 March 2013

"तात्पुरते निवृत्तिवेतन' देण्याचे आयुक्त डॉ. परदेशींचे आदेश

"तात्पुरते निवृत्तिवेतन' देण्याचे आयुक्त डॉ. परदेशींचे आदेश पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बहुचर्चित "एचबीओटी' यंत्रणा खरेदी प्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू केलेले तत्कालीन अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांना निवृत्तीनंतरचे कोणतेही आर्थिक लाभ देऊ नयेत, असे आदेश आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 31 जानेवारी रोजी दिले होते. पूर्वीच्या या आदेशात बदल करून डॉ. जगदाळे यांना "तात्पुरते सेवा निवृत्तिवेतन व भविष्य निर्वाह निधी' देण्यात यावा, असे आदेश आयुक्‍तांनी दिल्याने अधिकाऱ्यांकडून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

No comments:

Post a Comment