Pages

Sunday, 17 March 2013

आयुक्तांनी दिले आदेश; पण..कारवाई होणार का?

आयुक्तांनी दिले आदेश; पण..कारवाई होणार का?: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

पवना नदीपात्रात भराव टाकणार्‍यांवर कारवाई करावी, असा आदेश महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला आहे. नदीपात्रात भराव टाकणार्‍या जागा बळकावणार्‍या मालकांवर, राजकीय पाठबळ असणार्‍या बड्या धेंडांवर खरेच कारवाई होणार का, आयुक्तांचा आदेश प्रभाग स्तरावरील अधिकारी पाळणार का, असा प्रश्न शहरवासीयांमध्ये उपस्थित होत आहे.

आयुक्तांनी नुकतीच पवना पात्राची पाहणी केली. नदीत भराव टाकणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश त्यांनी प्रभागस्तरीय अधिकार्‍यांना दिला. खरोखरच ही कारवाई निष्पक्षपणे होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘लोकमत’ टीमने आज पवना व मुळा नदीपात्र कोठे अरुंद होत आहे, याची पाहणी केली. आजच्या घडीलाही पात्र अरुंद करण्याचा कार्यक्रम सुरूच असल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment