Pages

Wednesday, 10 April 2013

साहित्य संमेलन चिंचवड की, सासवडला निर्णय १९ ला

साहित्य संमेलन चिंचवड की, सासवडला निर्णय १९ ला: पुणे। दि. ८ (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीने पुन्हा महामंडळाच्याच कोर्टात चेंडू टाकला असून, संमेलन घ्यायचे की, नाही याबाबत ‘तारीख पे तारीख’ असा खेळ खेळला जात आहे.

चौथ्या विश्‍व साहित्य संमेलनासाठी लंडन येथून निमंत्रण आले असले तरी ते घ्यायचे अथवा नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याविषयीच आज मार्गदर्शक समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र समितीने हा निर्णय पुन्हा महामंडळावरच सोपविला आहे. मागील वर्षी टोरंटो येथील विश्‍व साहित्य संमेलन रद्द करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आणि त्यांना टिकेला सामोरे जावे लागले.

No comments:

Post a Comment