Pages

Monday, 1 April 2013

दोन वकिलांसह १२ जणांवर गुन्हा

दोन वकिलांसह १२ जणांवर गुन्हा: पिंपरी । दि. ३१ (प्रतिनिधी)

फुले-आंबेडकर गृहनिर्माण संस्थेची भोसरी प्राधिकरणातील जमीन बळकावल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन वकिलांचाही समावेश आहे.

बाळकृष्ण महादेव थोरात (४६, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. बबन नामदेव लांडगे (रा. लांडगे आळी, भोसरी), सुधीर रमेश बराटे, आनंद अमरनाथ लोणकर (दोघे रा. इंद्रायणीनगर, भोसरी), हर्षद प्रवीणभाई पटेल (३0, रा. मोशी प्राधिकरण), अँड. जी.एन.टिळेकर (रा. चिंचवड), अँड. सुरेश बी. टिळेकर (रा. देहूगाव), सतीश आनंद नलावडे , संजय दत्तासाहेब पिसाळ (दोघे, रा.भोसरी), सचिन बबन लांडगे, सचिन बाबासाहेब लांडगे (दोघे रा. लांडगेआळी, भोसरी), आशिष गायकवाड (रा. भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. गतवर्षी ५ ते ७ जुलैला चिंचवड गावातील दुय्यम निबंधक कार्यालयात हा फसवणुकीचा प्रकार घडला.

No comments:

Post a Comment